शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! घाईघाईत माता कचरा वेचण्यास गेली, इकडे चिमुकल्यास ट्रॅक्टरने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 19:14 IST

चिमुकल्यास रस्त्याच्याकडेला झोपवून माता कचरा वेचण्यास गेली होती

नांदेड: पोटाची खळगी भरण्याकरिता प्लॅस्टिक कचरा वेचण्यास गेलेल्या एका मातेवर ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्त्याच्या कडेला झोपवलेल्या चार महिन्याच्या बाळाला ट्रॅक्टरने चिरडले असल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजेदरम्यान, जुना कौठा परिसरात घडली.

या दुर्घटनेची माहिती अशी की, मुदखेड ( जि. नांदेड ) येथील रहिवासी असलेल्या मनिषा राहूल वाघमारे ( २२ ) कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या चार महिन्यांच्या चिमुकल्यास सोबत घेवून मनीषा कचऱ्यातील प्लॅस्टिक-बॉटल्या जमा करण्यास जुना कौठा परिसरात गेल्या. काम लवकर आवरण्याच्या उद्देशाने मनीषा यांनी चिमुकल्यास साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी झोपवले. दरम्यान, तेथे कचरा टाकण्याकरिता एक ट्रॅक्टर आले. चालकाने ट्रॅक्टर मागे घेताना त्याखाली रस्त्याच्या कडेला झोपवलेला चिमुकला चिरडला गेला.

काहीवेळाने तिथे आलेल्या मनीषाने समोरचे दृश्यपाहून हंबरडा फोडला. चिमुकला मरण पावल्याचे लक्षात येताच चालक तेथून ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार तथा सहाय्यक पोउपनि. ज्ञानोबा गिते व मदतनीस महिला पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली. याप्रकरणी मनिषा राहूल वाघमारे (रा. मुदखेड जि. नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. आनंद बिचेवार व हेडकॉन्स्टेबल बालाजी लाडेकर हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, नांदेडच्या कौठा परिसरात हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेड