शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन-तीन तासच झोपायचा; ‘अदालत’ वेबसिरीज पाहून रचला खुनाचा कट

By शिवराज बिचेवार | Updated: December 12, 2024 20:13 IST

मयताच्या नातेवाइकांना दुसऱ्यावरच होता संशय; गावातील मंडळींकडून माहिती काढण्यासाठी पोलिसांनी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना साध्या वेशात गावात तैनात केले होते.

नांदेड : वाका येथे ४ डिसेंबरच्या पहाटे किशन खोसे या वृद्धाचा खून करण्यात आला होता. अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा करून मदन हंबर्डे याला बेड्या ठोकल्या. बुधवारी न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिसकोठडी सुनावली. आरोपी मदन याने अदालत नावाची गुन्हेगारीविषयक वेबसिरीज पाहून खोसे यांच्या खुनाचा कट रचला होता. परंतु, मयताच्या नातेवाइकांचा मात्र दुसऱ्यावरच संशय होता. त्यातून त्यांनी अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, पोलिस मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळेच या प्रकरणात खरा मारेकरी सापडला. 

मुलाची हत्या, विवाहितेची आत्महत्या अशी पार्श्वभूमी किशन खोसे यांच्या हत्येला होती. त्यामुळे पोलिसांनी सर्वच बाजूंनी तपास सुरू केला होता. घटनेच्या दिवशी पहाटेची वेळ असल्यामुळे प्रत्यक्षदर्शी कुणीच नव्हता, तर किशन खोसे यांच्या मुलाच्या हत्येत तुरुंगात जाऊन पुन्हा बाहेर आलेला आनंदा हंबर्डे हाही गावातच होता. त्यामुळे पोलिसही बुचकाळ्यात पडले होते. त्यातच मयताच्या कुटुंबीयांनी आनंदा हंबर्डे याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याला जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम होते. घटनेच्या दुसऱ्याच दिवसापासून पोलिसांना मदन हंबर्डे याच्यावर संशय होता. परंतु, सर्व पुरावे हाती लागत नाहीत तोपर्यंत मदनला हात घालायचा नाही, अशी योजना आखण्यात आली होती. त्याच्या नकळत पोलिस त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. गावात मदनही नेहमी वावरतो, तसा वावरत होता. अनेकवेळा पोलिस काय चर्चा करतात? याचा कानोसा घेत होता. 

पोलिसांनीही त्याची खडानखडा माहिती मिळविली. त्यात मदन हंबर्डे हा अदालत नावाची गुन्हेगारीविषयक वेबसिरीज पाहात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. गोपनीय बातमीदाराकडूनही त्याच्याबद्दल अधिकची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा केले अन् मदनला उचलले. आता न्यायालयाने मदन हंबर्डेची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. याप्रकरणात पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, पोनि. उदय खंडेराय, सपोनि. चंद्रकांत पवार, पोउपनि. आनंद बिचेवार यांनी वाका गावात तळ ठोकून तपासाची चक्रे हलविली. गावातील अनेकांची चौकशी केली. सायबर तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. अशा प्रकारे किचकट खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

आरोपीची दोन ते तीन तासच झोपआरोपी मदन हंबर्डे याचे पाच वर्षांपूर्वी घरातील मंडळींसोबत भांडण झाले होते. त्यामुळे तो घरी जात नव्हता. दुकानात किंवा शेतातच झोपत होता. त्यात त्याची झोपही केवळ दोन ते तीन तासांचीच होती. उर्वरित वेळेत तो मोबाइलवर अदालत नावाची वेबसिरीज पाहायचा. या वेबसिरीजमध्ये गुन्हे कसे घडतात? पोलिसांचा तपास? शिक्षा? सुटायचे कसे? याबाबत त्याने माहिती मिळविली होती. फक्त सण - उत्सव किंवा पाहुणे मंडळी आल्यास तो घरी जायचा. गावातही त्याचे फारसे कुणाशी जमत नव्हते.

महिला कर्मचाऱ्यांनी केले सर्वेक्षणगावातील मंडळींकडून माहिती काढण्यासाठी पोलिसांनी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना साध्या वेशात गावात तैनात केले होते. महिला कर्मचारी वेश बदलून घरोघरी जाऊन शासकीय योजनांचे सर्वेक्षण करण्याच्या नावाखाली महिलांकडून काही माहिती मिळते का? याची चाचपणी करीत होत्या, तर पुरुष कर्मचारी शेतकऱ्यांच्या वेशात गावातील हॉटेल, कट्टे तसेच शेतात जाऊन काम करणाऱ्या मंडळींकडून माहिती घेत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड