शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

नांदेड गुरुद्वारा परिसरातील अनेक वर्षांपासूनच्या अतिक्रमणावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 7:28 PM

शहरातील सचखंड गुरुद्वारा भागातील प्रवेशद्वार क्रमांक १ च्या समोर फुटपाथवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते़ या अतिक्रमणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती़ त्यानंतर आता सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालविला़ त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला़

नांदेड : शहरातील सचखंड गुरुद्वारा भागातील प्रवेशद्वार क्रमांक १ च्या समोर फुटपाथवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते़ या अतिक्रमणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती़ त्यानंतर आता सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालविला़ त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला़

गुरुद्वारा गेट क्रमांक १ ते लंगर साहिबपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथवर २०१० पासून अतिक्रमण करण्यात आले होते़ याबाबत अनेकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती़ त्याचबरोबर लोकशाही दिनातही वारंवार हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, परंतु महापालिकेकडून अतिक्रमणाच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती़ याबाबत जगदीपसिंह नंबरदार यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती़ विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ जिल्हाधिकारी कार्यालयाने मनपाला पत्र पाठविले होते. परंतु त्यानंतरही अतिक्रमण ‘जैसे थे’ राहिले़ फुटपाथवर अतिक्रमण असल्यामुळे पायी जाणार्‍या भाविकांना रस्त्यावरुनच चालावे लागते.

या विषयात जगदीपसिंघ नंबरदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ त्यात महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नगरविकास मंत्रालय यांना प्रतिवादी बनविण्यात आले होते़ त्याची दखल घेत सोमवारी सकाळीच गेट क्रमांक १ च्या समोरील रस्त्यावर मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली़ यावेळी महापालिकेचे जवळपास ३० हून अधिक कामगार अतिक्रमणावर हातोडा चालवित होते़ दुपारपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे अतिक्रमण काढण्यात आले़ त्यामुळे या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला़ 

टॅग्स :Nandedनांदेड