शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा हाहाकार; अर्धापूरात पूरात अडकलेल्या २ कामगारांची सुटका, अनेक गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 12:10 IST

बामणी येथे कामगार पुराच्या पाण्यात अडकले; राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे रेस्क्यू ऑपरेशन

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड ) : गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात जोरदार पावसाने सुरुवात केली असून काल रात्री झालेल्या पावसाने तालुक्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर बामणी येथील काहीजण पुराच्या पाण्यात अडकले आहेत घटनास्थळी जिल्हाधिकारी दाखल राज्य आपत्ती दलाची शोध मोहीम सुरू

शेलगाव येथील नागरिकांचा संपर्क तुटलाअसना नदीस पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेलगाव येथील पुलावण पाणी जात असल्यामुळे संपर्क तुटला आहे तर अनेकांचे पशुधन पाण्यात अडकले आहेत.

तालुक्यात १४४ मि.लि पाऊस; घटनास्थळी प्रशासन दाखलतालुक्यात मॅन्युअल मोजणी प्रमाणे अंदाजे १४४ मि.लि पावसाची नोंद झाली आहे तर तालुक्यात आतापर्यंत ३६२ मिमि पावसाची नोंद झाली आहे. सदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विपिन इटणकर, अर्धापूर तहसील, पंचायत समिती कृषी विभाग, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे यावेळी तहसीलदार उज्वला पांगरकर, मारोतराव जगताप, गटविकास अधिकारी मीना रावताळे, पोनी अशोक जाधव, मंडळ अधिकारी संजय खिलारे, प्रफुल्ल खंडागळे व कृषी अधिकारी कृषी कर्मचारी तहसीलदार तलाठी आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बामणीत दोन कामगारांची पुरातून सुटका बामणी इथे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात दोन मजूर अडकून पडले होते, एसडीआरएफ च्या पथकासह गावकऱ्यांनी बचाव कार्य राबवत या दोन्ही मजुरांना वाचवलय. दोन्ही मजूर हे झारखंड राज्यातील असून पुलाच्या सुरू असलेल्या कामावर ते थांबले होते. मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढल्याने हे दोघे जण पुराच्या विळख्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाने सकाळ पासून मदतकार्य करत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले.

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसfloodपूर