शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

जीपीएसमुळे होणार धान्य काळा बाजार रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:46 IST

कृष्णूरच्या औद्योगिक वसाहतीतील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामावर छापा मारुन पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारखान्यात जाणारे गहू आणि तांदळाचे दहा ट्रक पकडले होते़ पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात धान्याचा काळा बाजार करणारे मोठे रॅकेट असल्याचे आढळून आले़ त्यासाठी पोलिसांनी धान्य घेवून जाणाऱ्या वाहनांच्या जीपीएसचा डेटा मिळविला असून त्याद्वारे या रॅकेटचा पर्दाफाश होणार आहे़ परंतु, पोलिसांची ही कारवाईच गोत्यात आणण्यासाठी अनेकांनी खलबते सुरु केली आहेत़

ठळक मुद्देतपासात पोलिसांनी गोळा केले धान्य वाहतुकीचे रेकॉर्ड

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कृष्णूरच्या औद्योगिक वसाहतीतील मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामावर छापा मारुन पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारखान्यात जाणारे गहू आणि तांदळाचे दहा ट्रक पकडले होते़ पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात धान्याचा काळा बाजार करणारे मोठे रॅकेट असल्याचे आढळून आले़ त्यासाठी पोलिसांनी धान्य घेवून जाणाऱ्या वाहनांच्या जीपीएसचा डेटा मिळविला असून त्याद्वारे या रॅकेटचा पर्दाफाश होणार आहे़ परंतु, पोलिसांची ही कारवाईच गोत्यात आणण्यासाठी अनेकांनी खलबते सुरु केली आहेत़शासकीय धान्याची वाहतूक करण्यासाठी एका कंपनीला ११५ वाहनांना जीपीएस बसविण्याचे कंत्राट देण्यात आले होते़ परंतु, कंत्राटदाराने त्यापैकी केवळ ६५ वाहनांमध्येच जीपीएस यंत्रणा बसविल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्यामुळे तीन वाहने धाब्यावर थांबली होती़ ही धान्य वाहतूक करणाºया कंत्राटदाराने दिलेली सबब किती सत्य? याचाही उलगडा होणे सोपे आहे़ ती तीन वाहने धाब्यावर थांबली होती तर इतर सात वाहनांचे काय? ज्या वाहतूक ठेकेदाराकडे धान्य वाहतुकीचे काम आहे़ तो ठेकेदार मुसलमानवाडी येथील धान्य गोदामातून स्वस्त धान्य दुकानापर्यंत एक क्विंटल धान्य नेण्यासाठी फक्त ४ रुपये ५० पैसे दर घेतो़तर शासकीय वाहतुकीचा दर हा जवळपास ७ रुपये प्रतिक्विंटल असल्याची माहिती हाती आली आहे़ त्यामुळे यामध्ये राहणारी तूट वाहतूकदार कशी भरुन काढत होते़ हाही संशोधनाचा विषय आहे़ अशाप्रकारे दर महिन्याला वाहतूक पुरवठाधारकाला १३ लाख रुपयांचा तोटा होत असल्याची माहिती हाती आली आहे़ या प्रकरणात पोलिसांनी धान्याचा काळा बाजार होत असल्याचे भक्कम पुरावे गोळा केले आहेत़ त्यात जीपीएसचा डेटाही महत्त्वाचा ठरणार आहे़ या डेटाच्या मदतीने धान्य काळा बाजाराची ही साखळी उघडी पडणार आहे़---तपास आता नुरुल हसन यांच्याकडेया प्रकरणात यापूर्वी सपोनि मरे यांच्याकडे तपास होता़ परंतु, या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी हा तपास आता सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे दिला आहे़ नुरुल हसन हे कडक शिस्तीचे अन् नियमावर बोट ठेवणारे अधिकारी आहेत़ वाळूमाफियांना सळो की पळो करुन सोडणाºया नुरुल हसन यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आल्यामुळे काळा बाजार करणाºया बड्या मंडळीचे धाबे दणाणले आहेत़---पोलीस दबावतंत्र वापरत असल्याचा आरोपकृष्णूर धाड प्रकरणात पोलीस विभागामार्फत वस्तुस्थिती व कार्यपद्धती समजून न घेता चुकीच्या पद्धतीने तसेच पूर्वगृहदूषित पद्धतीने तपास केला जात असून महसूल विभागाच्या कर्मचाºयावर दडपण आणण्याचे काम सुरू असल्याची तक्रार राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणात शासननिर्णयाचा अभ्यास करुन तपास करावा. या तपासासाठी पुरवठा प्रशासन सहकार्य करण्यास तयार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांकडून असाच पूर्वगृहदूषित तपास सुरू राहिल्यास ५ आॅगस्टपासून कामबंद आंदोलनाचा इशाराही संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मुंडे, विजय चव्हाण,श्रीकांत गायकवाड, सुरेखा नांदे, संतोषी देवकुळे, मुगाजी काकडे, उत्तम निलावाड आदींनी दिला आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसfoodअन्नCrimeगुन्हा