शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. हद्दीत विनापरवानाच कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:56 IST

नांदेड शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी आपला मोर्चा वळवला आहे. मात्र हे काम करताना अकृषिक आदेश व बांधकाम परवानगी न घेताच कामे केली जात असून याबाबत अनेक तक्रारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देपरवानगीचे अधिकार महसूल विभागाकडे, बांधकाम व्यावसायिक ग्रामीण भागात

नांदेड : नांदेड शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी आपला मोर्चा वळवला आहे. मात्र हे काम करताना अकृषिक आदेश व बांधकाम परवानगी न घेताच कामे केली जात असून याबाबत अनेक तक्रारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.महाराष्ट्र ग्रामपंचायत व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन रचना सुधारणा अधिनियम क्रं. ४३ दि. २९ डिसेंबर २०१४ नुसार महापालिका हद्दीबाहेरील ग्रामीण भागात विकासकामे करण्यापूर्वी महसूल विभागाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. यापूर्वी महापालिका हद्दीबाहेर त्या त्या ग्रामपंचायती बांधकाम परवानगी देत असत. मात्र नव्या नियमानुसार ग्रामपंचायतीऐवजी महसूल विभागाला अर्थात तहसील विभागाला हे अधिकार प्राप्त झाले आहेत. नांदेड शहरानजीक असलेल्या वाडी बु., विष्णूपुरी, पांगरी, हस्सापूर, नसरतपूर, पुयणी व नेरली या गावांमध्ये होणाऱ्या बांधकामांना महसूल विभागाकडून परवानगी देण्यात येत आहे.मात्र परवानगीविनाच अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून फ्लॅट, दुकाने व घर बुकींग केली जात आहे. सध्या दिवाळी सणानिमित्त नांदेड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांकडून जाहिरातीच्या माध्यमातून बुकींग करण्याचे आवाहन केले जात आहे. या बुकींग केल्यानंतर नागरिक बँकेचे कर्ज काढण्यासाठी गेले असता त्यांचे कर्ज प्रस्ताव नाकारले जात आहेत.बांधकाम व्यावसायिकाकडे कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी तसेच ले-आऊटही नसल्यामुळे बँकेमध्ये कर्जप्रस्ताव नाकारले जात आहे. फ्लॅट, रो-हाऊस, दुकाने खरेदी केल्यानंतर नागरिकांचे कर्जासाठी अशी तारांबळ उडत आहे. याबाबत अनेकांनी नांदेड तहसील कार्यालयात तक्रारीही केल्या आहेत.‘अधिकृत ले-आऊट बघूनच व्यवहार करावेत’शहरानजीक वाडी बु., विष्णूपुरी, पांगरी, हस्सापूर, नसरतपूर, पुयणी, नेरली आदी गावांमध्ये तसेच महापालिका हद्दीतही बांधकाम व्यावसायिकांकडून फ्लॅट, रो-हाऊस, दुकाने विकत घेताना नागरिकांनी अधिकृत अकृषिक आदेश व बांधकाम परवानगी सदर व्यावसायिकाकडे आहे काय? याची खात्री करावी. त्यानंतरच व्यवहार करावेत. ले-आऊट पाहताना नगररचना कार्यालयाकडून तो मंजूर आहे की नाही? हेही तपासून व्यवहार करावेत व भविष्यात होणारी आपली फसवणूक टाळावी, असे आवाहन नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी केले.

टॅग्स :Nandedनांदेडgram panchayatग्राम पंचायतHomeघर