शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

शासनाच्या 'संकल्प यात्रे'ला अर्धापूरात ब्रेक; ग्रामस्थांच्या विरोधानंतर कार्यक्रम गुंडाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 13:26 IST

पोलिसांचा ताफा दाखल झाला मात्र एकही ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित राहिला नाही

- गोविंद टेकाळे अर्धापूर ( नांदेड ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात भारत संकल्प रथयात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेदरम्यान पिंपळगाव महादेव येथील मराठा समाज आणि इतर ग्रामस्थांनी "भारत सरकारचा कार्यक्रम की मोदी सरकारचा कार्यक्रम" असा जाब अधिकाऱ्यांना विचारला. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात कोणताही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा दिल्याने अधिकाऱ्यांनी संकल्प यात्रा लागलीच गुंडाळली. 

शासकीय योजनांची माहिती संवादासाठी महाराष्ट्रात गुरुवार दि.१६ पासून सुरू झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ च्या राज्यस्तरीय मोहिमेचा प्रारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सदर यात्रा देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यातील गावोगावी राबविण्यात येत आहे. तर नांदेड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून ही यात्रा सुरू करण्यात आली.

अर्धापूर तालुक्यात दि.२३ नोव्हेंबर रोजी आज पहिल्याच दिवशी विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ पिंपळगाव महादेव येथे आला. मात्र, येथील ग्रामस्थ व मराठा समाज बांधवांनी हा कार्यक्रम घेण्यात येऊ नये असा पवित्रा घेतला होता. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणताही कार्यक्रम नको, आमच्या जखमेवर मीठ न टाकता, आम्हाला प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले.

पोलिसांचा ताफा दाखल, प्रशासनाने कार्यक्रम गुंडाळलाराशन कार्ड, घरकुल, मनेरगा अंतर्गत विहीर, शेततळे आदी योजना अर्धापूर तहसील व पंचायत समितीने प्रभावी पणे राबवत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. नुसती कार्यक्रमातून चमकोगीरी नको असा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक मस्के यांच्या पोलीस पथकाने कडक बंदोबस्त दिल्याने सदर कार्यक्रम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण या कार्यक्रमास गावातील एकही नागरीक उपस्थित राहीला नसल्याने प्रशासनाने काढता पाय घेत सदर कार्यक्रम गुंडाळला.

अनेक दिवसांपासून पिंपळगाव म. सक्रिय...मराठा समाजाच्या मागणीसाठी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण, आमरण उपोषण, सामुहिक मुंडण, असंख्य महिला पुरुष मराठा समाज बांधवांचा सामुहिक जेलभरो आदी लक्षवेधी आंदोलने करत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.

टॅग्स :GovernmentसरकारNandedनांदेडNarendra Modiनरेंद्र मोदी