शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

चुकीची वेतननिश्चिती करून शासनाची फसवणूक; प्राध्यापकांकडून होणार कोटींची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:20 IST

प्राध्यापकांकडे चुकीच्या वेतननिश्चितीमुळे गेलेली आगाऊ रक्कम वसूल करण्याचे पत्र विभागीय सहसंचालकांनी काढले आहे.

नांदेड : शासन आणि प्रशासनाची दिशाभूल करत काही प्राध्यापकांनी चुकीच्या पद्धतीने आपली वेतननिश्चिती करून घेतल्याचा प्रकार नांदेड विभागाच्या विभागीय सहसंचालक, उच्चशिक्षण यांच्या निदर्शनास आला. आता नव्याने सुधारित वेतननिश्चिती झाल्यास संबंधित जवळपास आठ ते दहा प्राध्यापकांकडे सव्वा कोटींहून अधिक रुपये वसूलपात्र ठरतात. त्यामुळे चुकीची वेतननिश्चिती करून शासनाचे आगाऊ वेतन लाटणाऱ्या प्राध्यापकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

शासनाच्या उच्चशिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक कार्यालय नांदेडात आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या भरतीपासून त्यांच्या पदाला मान्यता देणे, मुलाखती घेणे तसेच वेतननिश्चिती करणे, वेतनवाढ आदी कामे पार पाडली जातात. त्यामुळे सदर कार्यालय हे नेहमीच चर्चेत राहते. दरम्यान, नव्यानेच रुजू झालेल्या सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी कार्यालयाला शिस्त लावण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली आहेत. प्रामुख्याने या कार्यालयास प्राप्त होणारी सर्व प्रकरणे ई-ऑफिस प्रणालीद्वारे विहित वेळेत निकाली काढण्यावर भर दिला. त्यामुळे प्राध्यापकांचे वेतन वेळेत होण्याबरोबरच त्रुटी दूर होण्यास मदत झाली. त्यामुळे प्राध्यापक आणि प्राध्यापक संघटनादेखील या कार्यालयाच्या कामकाजावर समाधानी आहेत. मात्र, काही प्राध्यापकांनी विभागीय सहसंचालक यांच्याविरोधात काही आरोप केले. त्यातील तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित प्राध्यापकांकडे चुकीच्या वेतननिश्चितीमुळे गेलेली आगाऊ रक्कम वसूल करण्याचे पत्र विभागीय सहसंचालकांनी काढले आहे. त्याच आकसातून त्यांनी सदर कार्यालयावर खोटे आरोप केल्याचा खुलासा विभागीय सहसंचालक कार्यालयाने केला आहे.

तक्रारदार प्राध्यापकांकडेही शासनाचे लाखो रुपयेया प्रकरणात एस. व्ही. शिंदे यांच्यासह बी. जी. नेम्मानीवार आणि इतर आठ ते दहाजणांकडे शासनाचे प्रत्येकी १० ते २० लाख रुपये वसुली पात्र आहेत. जवळपास सव्वा ते दीड कोटी रुपये शासनाची वसूलपात्र रक्कम आहे. नेम्मानीवार यांना पीएच.डी या पदवीच्या देय ठरणाऱ्या पाच अतिरिक्त वेतनवाढी शासन धोरणानुसार व न्यायालयीन आदेशानुसार प्रारंभिक वेतनावर न देता त्या संबंधिताच्या पूर्वीचे वेतन संरक्षित करून त्यावर एक काल्पनिक वेतनवाढ देऊन त्यावर पाच अतिरिक्त वेतनवाढी दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनावरून अशा अनेक प्राध्यापकांची सुधारित वेतननिश्चिती करण्यात येत आहे.

टॅग्स :Nandedनांदेड