शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा गौरव ही समाधानाची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:56 IST

ग्रामीण भागातील महिला अतिशय खडतर परिस्थितीला सामोरे जात आपल्या कुटंबाला सावरत समाजात आपल्या मुलांना असामान्य पदावर पोहोचवण्याचे काम करतात.

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

गडगा : ग्रामीण भागातील महिला अतिशय खडतर परिस्थितीला सामोरे जात आपल्या कुटंबाला सावरत समाजात आपल्या मुलांना असामान्य पदावर पोहोचवण्याचे काम करतात. अनेक हालअपेष्टा सोसतात. कठीण परिस्थितीत अतिशय चिवट झुंज देऊन असामान्य कर्तृत्व गाजवतात. मात्र तुलनेने त्यांचा सन्मान होत नाही. परंतु अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरव केला. यानिमित्ताने महिलांचा सन्मान झाला, ही बाब गौरवास्पद आहे, असे मत महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.न्यू जयभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या राजमाता अहिल्यादेवी महोत्सव पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव केंद्रे हे होते.मंचावर प्रदेश प्रवक्ते गणेशराव हाके, खा. प्रीतम मुंडे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, डॉ. माधवराव किन्हाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर, आ. तुषार राठोड, महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख, माणिक लोहगावे, प्रवीण पा. चिखलीकर, माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, श्रावण पाटील भिलवंडे, दिलीप धर्माधिकारी उपस्थित होते.मुंडे पुढे म्हणाल्या, मराठा समाजाच्या आरक्षणासारखाच धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हाताळू. धनगर समाजाच्या ताकदीमुळेच आम्ही राज्य करीत आहोत. तुम्हाला दिलेला शब्द पाळणे हे माझे दायित्व समजते. कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकारला सकारात्मक अहवाल पाठवूच असे आश्वासन देत नरसीचा रखडलेला पाणीपुरवठ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगत लोकांना पाणी पाजविणाऱ्याच्या पाठीशी उभे रहा असे म्हणतानाच राजेशभाऊ तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहीन असे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत. ज्यांना- ज्यांना आम्ही उमेदवारी देऊ अशा उमेदवारांच्या पाठीशी राहून पुन्हा केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आणा असे सांगत जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपाच्या पाठीशी राहा, असेही त्या म्हणाल्या. गुरूप्रीतकौर सोडी, दिलीप सिंग सोडी, राजश्री पाटील, धनश्री देव, देवीदास राठोड, मारोती वाडेकर, संजय पवार, शंकरराव काळे, रामेश्वर गंदपवार, जयराम कदम, धनराज शिरोळे,शंकर कल्याण, सचिन पाटील बेंद्रीकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडPankaja Mundeपंकजा मुंडे