त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता म्हणजेच रामनवमी च्या पूर्वसंध्येला प्रख्यात गायक संजय जोशी यांच्या सुश्राव्य ‘गीतरामायण’ हा जुन्या स्मृतीला उजाळा देणारा कार्यक्रम फेसबुकवर लाइव्ह करण्यात येईल. या कार्यक्रमात मुख्य गायक संजय जोशी यांच्या समवेत वीणा जोशी दीक्षित, शबरी हिरवे, डॉ. कल्याणी जोशी व चैती दीक्षित या सहगायिका असून त्यांना डॉ. जगदीश देशमुख (तबला) , पंकज शिरभाते (व्हायोलिन), स्वरूप देशपांडे (संवादिनी) व स्वरेश देशपांडे (विविध तालवाद्ये) या दिग्गज कलावंतांची साथ संगत राहणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन पूजा शिराढोणकर - देशपांडे यांचे असून हा आभासी कार्यक्रम संस्कार भारती नांदेडच्या फेसबुक पेज वरून लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येईल.
या नऊ दिवस चाललेल्या श्रीराम नामगुणसंकीर्तन सप्ताहाचा समारोपाला २१ एप्रिल रोजी रामजन्म या विषयावर मीरा शेंडगे (औरंगाबाद) यांचे संकीर्तनाने सायं ४ ते ५-३० वाजता होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड समितीचे अध्यक्ष दिगंबरराव देशमुख, डॉ. प्रमोद देशपांडे (सचिव), तसेच समितीचे जयंतराव वाकोडकर, अंजली देशमुख, डॉ. अनुराधा पत्की, राधिका वाळवेकर, विजया कोदंडे, सुवर्णा कळसे, डॉ. वैशाली गोस्वामी, शर्वरी सकळकळे (जिल्हाप्रमुख), प्रा. डॉ. जगदीश देशमुख (देवगिरी प्रांत सहसचिव) आदींनी केले आहे.