शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ओटीपी दिला अन् ८० हजार गेले, पण सायबर पोलिसांमुळे परतही मिळाले

By शिवराज बिचेवार | Updated: August 19, 2023 18:32 IST

सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत.

नांदेड- ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसांमध्ये वाढच होत आहे. त्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन फंडे वापरत आहेत. नांदेड शहरातील आनंद नगर भागात एका व्यक्तीला बँक खात्याला लिंक असलेले पॅन कार्ड अपडेट करायचे म्हणून ओटीपी मागण्यात आला. ओटीपी देताच संबधित व्यक्तीच्या खात्यातून ८० हजार ५०० रुपये वळते करण्यात आले. याबाबत लगेच विमानतळ आणि सायबर सेलकडे तक्रार केल्यानंतर तातडीने पावले उचलत ही रक्कम परत मिळविण्यास यश आले आहे.

मुंजाजी प्रकाशराव डाढाळे यांना अनोळखी क्रमांकावर फोन आला होता. तुमच्या ॲक्सीस बँक खात्याला लिंक असलेले पॅन कार्ड अपडेट करावयाचे आहे, असे समोरच्या व्यक्तीने सांगितले. तसेच डाढाळे यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. डाढाळे यांनीही ओटीपी समोरील व्यक्तीला दिला. त्यानंतर डाढाळे यांच्या बँक खात्यातून ८० हजार ५०० रुपये काढल्याचा संदेश आला. त्यामुळे आपली कुणीतरी फसवणुक केल्याचे डाढाळे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने विमानतळ आणि सायबर सेलकडे तक्रार केली. सायबर सेलने संबधित बँका वॉलेट यांचे नोडल अधिकारी यांना ईमेलद्वारे संपर्क साधण्यात आला. तसेच पाठपुरावा करुन डाढाळे यांची गेलेली ८० हजार ५०० रुपयांची रक्कम परत त्यांच्या खात्यात वळती करण्यात आली.

ओटीपी, वैयक्तिक माहिती देवू नकासायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. त्यामुळे अनोळखी क्रमांकावर फोन आल्यानंतर त्यांना कोणतीही वैयक्तिक माहिती, ओटीपी देवू नये. लिंकही ओपन करु नये. फसवणुक झाल्यास तात्काळ संबधित पोलिस ठाणे आणि सायबर सेलशी संपर्क साधावा असे आवाहन पोनि.ओमकांत चिंचोलकर यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमNandedनांदेड