शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गणपूर दरोड्यातील टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:45 IST

चाकू व कोयत्याने हल्ला करुन घरातील दागिणे, रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड : चाकू व कोयत्याने हल्ला करुन घरातील दागिणे, रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. अर्धापूर ठाण्यात सदर घटनेप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे संभाजी एकनाथ मोहिते यांच्या घराचा दरवाजा तोडून १६ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच जणांनी चाकुने हल्ला करत १ लाख ११ हजार रुपयांचा लंपास केला होता. या प्रकरणाच्या तपासात २८ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेला माहिती मिळाली. माधव मोहिते आणि चांदू मोहिते यांचा या दरोड्यात सहभाग होता. या माहितीवरुन पोलिस निरीक्षक सुनिल निकाळजे यांनी सहायक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती व अन्य कर्मचाºयांचे एक पथक तयार केले. या पथकाने आरोपींचा नांदेड, पुणे तसेच चंद्रपूर जिल्ह्यात शोध घेतला. या दरोड्यातील माधव उर्फ रवि संभाजी मोहिते (वय २४, रा. पळसगाव ता. वसमत), सचिन भास्कर जाधव (वय २३, रा. पिंपळशेंडा जि. वाशिम), मो. रियाज मो. अली (वय २४, रा. आसाम) या तिघांना चंद्रपूर येथून आणि सारंग शंकर गोदरे (वय २७, रा. गणपूर ता. अर्धापूर) याला गणपूर येथून ताब्यात घेतली. त्यांची विचारपूस केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.या दरोड्यातील चांदू मोहिते हा आंतरराज्य टोळीतील आहे. त्याचा एक साथीदार लक्ष्मण मेटकर याला दोन महिन्यापूर्वीच स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील २ आणि तेलंगणा राज्यातील १२ दरोड्याचे गुन्हे उघडकीस आले होते. पोलिसांनी पकडलेल्या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचेही पोलिस अधीक्षक जाधव म्हणाले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे, सहायक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती यांची उपस्थिती होती.गुप्तधनाच्या लालसेतून जवळच्यांनीच रचला डावगणपूर येथील संभाजी मोहिते यांना गुप्तधन सापडल्याची चर्चा होती. याच गुप्तधनाच्या लालसेतून गावातीलच सारंग गोदरे याने गुप्तधनाच्या लालसेने दरोड्याचा कट रचला होता. त्याने दिलेल्या माहितीवरुनच माधव संभाजी मोहिते, सचिन जाधव, मोहमद रियाज यांनी १६ नोव्हेंबर रोजी दरोडा टाकला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीसRobberyदरोडा