शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

फ्युचर मंत्राने दिला विद्यार्थ्यांना आत्मविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:13 IST

आज करिअरचे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत़ त्यामधून आपला कल जाणून घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा, हे विद्यार्थ्यांनी लोकमत आणि व्हीआयटी (व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) च्या वतीने आयोजित ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमातून जाणले व सर्वच विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी एक नवा आत्मविश्वास मिळाला़

ठळक मुद्देकरिअर मार्गदर्शनलोकमत व व्हीआयटी आयोजित उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड : आज करिअरचे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत़ त्यामधून आपला कल जाणून घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा, हे विद्यार्थ्यांनी लोकमत आणि व्हीआयटी (व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) च्या वतीने आयोजित ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमातून जाणले व सर्वच विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी एक नवा आत्मविश्वास मिळाला़नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात २ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता झालेल्या ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़यावेळी व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीचे अ‍ॅसि़ प्रोफेसर डॉ़पुंडलिक रामभाऊ भगत, डॉ़ रणजीत शाही, हर्षदभाई शहा, प्रो़व्ही़डी़ कोनाळे आदी उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली़‘लोकमत’ नांदेड शाखेचे सहा़ सरव्यवस्थापक विजय पोवार यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले़ त्यानंतर मोटिव्हेशनल स्पीकर डॉ़रणजीत शाही यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले़दुसऱ्या सत्रात हर्षदभाई शहा यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे व त्याप्रमाणे अभ्यास करावा व अभियांत्रिकी विषय का निवडावा, अभियांत्रिकीमधील विविध विभागांची माहिती दिली़ तसेच व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीचे असि़प्रोफेसर डॉ़पुंडलिक रामभाऊ भगत यांनी विद्यार्थ्यांना चेन्नई, वेल्लोर, भोपाळ आणि आंध्रप्रदेशात असणाºया व्हीआयटीबाबत सविस्तर माहिती दिली़अद्ययावत ज्ञान देण्याचा व्हीआयटीचा प्रयत्न असतो, असे त्यांनी स्पष्ट केले़ भव्य कॅम्पस, सुसज्ज वर्गखोल्या, कॅम्पस मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत संधी याविषयी माहिती दिली़ व्हीआयटीच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे आज अनेक परदेशी विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असून तुम्हीही करिअर घडविण्यासाठी व्हीआयटीची मदत घ्या, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले़ यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण केले़ शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ काढून विजेत्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या़

  • कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला खरेच मोठे व्हायचे असेल तर तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा

एक म्हणजे जिंकण्याची जिद्द ठेवा, दुसरे तुमचे ध्येय निश्चित करा व तिसरे म्हणजे, स्वत:वर विश्वास ठेवा, कॉन्फिडंट रहा, ओव्हर कॉन्फिडंट नको़स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर तुम्हाला सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहिले पाहिजे़ यासाठी अगदी सुरुवातीपासून तुमचे ध्येय निश्चित करा, तुमच्या आवडीनिवडी जाणून घ्या, अशा शब्दात रणजीत शाही यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली़

टॅग्स :NandedनांदेडLokmat Eventलोकमत इव्हेंटStudentविद्यार्थी