शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बोगस खत विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:57 IST

जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देमातीमिश्रित खततपासणी होत नसल्याने बोगस खतांची निर्मिती

नांदेड : जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खताच्या बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून शेतक-यांना चक्क मातीमिश्रित खते विक्री केल्याचा प्रकार पुढे आला असून यावर आता कृषी विभागाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.जिल्ह्यात १८:१८:१० या मिश्र खतांची निर्मिती करणारे पाच कारखाने आहेत तर लातूर येथेही एक कारखाना आहे. या कारखान्यामध्ये निर्मित होणा-या खताच्या गुणवत्तेबाबत तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात अशी तपासणी होत नसल्यान बोगस खतनिर्मितीला चालनाच मिळत आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यात दोन खत कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल झाले असले तरीही प्रत्यक्षात अशा कारखान्यातून वितरित झालेल्या खताचे काय, असा प्रश्न पुढे आला आहे. हजारो मेट्रीक टन बोगस खत आज शेतकºयांच्या माथी मारण्यात आले आहे. कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असून शेतकरी कसेतरी पेरण्या करीत आहेत. या पेरणीनंतर शेतक-यांना मिश्र खतांची गरज असते. हे मिश्र खत मातीमिश्रित असल्याचा प्रकार उघड झाला आहे. नांदेड ग्रामीण ठाण्यात पारसेवार अ‍ॅग्रो प्रा.लि. विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खताचा दर्जा तपासण्यासाठी कृषि विभागाने तो संबंधित विभागाकडे पाठविला होता. मात्र अहवाल येण्यापूर्वीच खताची विक्री सुरू होती़नामांकित कंपन्यांचीच मिश्र खते वापरावीतशेतक-यांनी मिश्र खते घेताना केंद्र सरकारच्या नियंत्रणातील नामांकित कंपन्याचेच मिश्र खते वापरणे सद्य-स्थितीत आवश्यक आहे. स्थानिक कारखान्यात मिश्र खतामध्ये ज्या प्रमाणात रासायनिक घटकांची गरज असते ती घटक उपलब्ध नसल्याचे आढळून येत आहे. यातून शेतकºयांचे आर्थिक नुकसान तर होत आहेच पण शेतीच्या गुणवत्तेवरही परिणाम होत आहे. शेतक-यांनी मिश्र खते खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक कानवडे यांनी केले आहे.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती