शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

बिलोली महामार्गावरील चार दुकाने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:47 IST

येथील हैदराबाद महामार्गावरील पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या दुकानांना गुरुवारी पहाटे ४ वाजता आग लागली़ सदरील घटनेत चार दुकानांचा संपूर्ण कोळसा झाला़ अन्य तीन दुकानांचे नुकसान झाले़ पोलीस व तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले़ यामध्ये एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला़

ठळक मुद्देपोलीस, स्थानिक तरुणांच्या दोन तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : येथील हैदराबाद महामार्गावरील पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या दुकानांना गुरुवारी पहाटे ४ वाजता आग लागली़ सदरील घटनेत चार दुकानांचा संपूर्ण कोळसा झाला़ अन्य तीन दुकानांचे नुकसान झाले़ पोलीस व तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले़ यामध्ये एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला़तहसील व पंचायत समितीच्या शेजारी साई झेरॉक्स स्टेशनरी, संकेत झेरॉक्स सेंटर, संगमेश्वर झेरॉक्स व संगणक केंद्र, अनिल सूर्यवंशी डीटीपी केंद्र अशी सुशिक्षित बेरोजगारांची दुकाने आहेत़ गुरुवारी पहाटे ४ वाजता साई झेरॉक्समधून आगीचे लोळ निघताना पोलिसांना दिसले़ हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातून कर्तव्यावर असलेले पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले़ या परिसरातील तरुणांना सोबत घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला़ मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने जवळ जाणे देखील अवघड झाल्याचे सपोनि विजय पंतोजी यांनी सांगितले़ शेजारच्या तीन दुकानातील साहित्य बाहेर काढून दुकाने रिकामे करण्यात आली़ तहसील कॅन्टीन मध्ये असलेले सात गॅस सिलेंडर छताला भगदाड पाडून बाहेर काढण्यात आले़ त्यामुळे मोठा अनर्थ टळला़ दुसऱ्या बाजूला शारद मोरलावार यांचे राघवेंद्र स्टेशनरी स्टोअर्स असून येथे मोठ्या प्रमाणात शासकीय, शैक्षणिक उपयोगी येणारे साहित्य होते़ पोलिसांनी शटर तोडून संपूर्ण साहित्य बाहेर काढले़ मात्र एका आलमारीला आगीची झळ बसली़ साई बोडके, संग्राम हायगले, दत्ता बोडके, अनिल सूर्यवंशी यांच्या दुकानातील एकूण पाच मोठ्या झेरॉक्स मशीन, तीन संगणक, लॅपटॉप, व्हीडीओ शुटींग कॅमेरा, फोटो कॅमेरा, कलर झेरॉक्स मशीन, जनरेटर मशीन, स्कॅनर, झेरॉक्सचे दोन हजार पेपर्स, मुळ शैक्षणिक कागदपत्रे, विविध लग्नाचे २००९ पासूनचा मूळ डाटा, लग्न पत्रिका, बँक पासबुक, चेकबुक, रोख चार हजार रुपये, फोटो, कॅमेरा, इनव्हरर्टर, बॅटरी, फर्निचर असे जवळपास २० लाखांचे नुकसान झाले आहे़पोलिसांनी देगलूर व धर्माबाद येथील अग्निशामक दलाचे बंब मागविले़ मात्र त्यांना येण्यास विलंब झाला़ सकाळी सहा वाजता दोन्ही वाहने आली़ तब्बल २ तास सुरू असलेल्या आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले़ कर्तव्यावर असलेले सपोनि विजय पंतोजी, पोनि भगवान धबडगे, कॉन्स्टेबल शेख तौफिक चाँद आदीसह शहरातील मुस्लिम समाजाच्या १० ते १२ तरुणांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले़दोनच दिवसापूर्वी खरेदीसाई बोडके पोखर्णीकर या तरुणाने लग्न सराईचा हंगाम असल्याने एक लाखाच्या कोºया लग्नपत्रिका २१ मार्च रोजी खरेदी केल्या होत्या़ संपूर्ण गठ्ठे जळून खाक झाले़ तर संग्रमा हायगले यांनी बुधवारीच झेरॉक्स मशीन खरेदी केली होती़ घटनेत मशीनचा कोळसा झाला़ सदरील आग विझवताना चाँद तौफिक शेख या पोलीस कर्मचाºयाच्या हाताला जखम झाली़ बिलोली येथे अग्निशमक दलाची व्यवस्था नसल्याने धर्माबाद, देगलूर येथून वाहने मागविले होते़

टॅग्स :fireआगhighwayमहामार्गbusinessव्यवसाय