शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

दरोड्याच्या तयारीतील चौघे जेरबंद; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक गुन्हे उघडकीस येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 17:06 IST

कारवाई दरम्यान चार आरोपी फरार झाले असून पोलीस तपास करत आहेत

नांदेडः दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना तब्बल १३ लाख ३३ हजार ७०० रूपयांच्या मुद्देमालासह 'स्थागुशा'च्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई २५ ऑगस्ट रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील टापरे चौक परिसरात करण्यात आली. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील 'एलसीबी' अर्थातच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी, कर्मचारी २५ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंगवर होते. दरम्यान, टापरे चौक परिसरात काही संशयित लोक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत चार जणांना जेरबंद केले. तर चौघे फरार होण्यात यशस्वी झाले. राजेंद्र उर्फ दादा छगन काळे (वय-४८ वर्षे, रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद),  संजय उर्फ पिल्या उर्फ भैय्या राजेंद्र तथा दादा काळे (वय-२५ वर्षे, रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद) नितीन भारत डिकले (वय- २८, रा.मस्सा) व प्रदीप बाळासो चौधरी (वय-२७, रा. उरळीकांचन ता. हवेली जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. तर रविंद्र बप्पा काळे, शंकर सुरेश काळे, अनिल रमेश शिंदे (तिघेही रा.मस्सा ता.कळंब जि. उस्मानाबाद) व अरूण बबनराव शिंदे (रा. मोहा ता. कळंब जि. उस्मानाबाद) हे फरार आहेत.

आरोपींकडून धारदार शस्त्र, टॉमी, हातोडी, लोखंडी रॉड, दोर, मिरची पुड, मोबाईल हैंडसेट व दोन चारचाकी वाहने असा एकूण तब्बल १३ लाख ३३हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनुक्रमे पांडुरंग माने, शिवसांब घेवारे, पोउपनि. दत्तात्रय काळे, हेडकॉन्स्टेबल सुरेश घुगे, मारोती तेलंग, पोलीस नाईक बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, पो.कॉ. तानाजी येळगे, मोतीराम पवार,बालाजी यादगीरवाड, वाहनचालक हेमंत बिचकेवार, शेख कलीम यांच्या पथकाने केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड