शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बाभळी धरणाचे पाच दरवाजे उघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:26 IST

जूनमध्येच आगमन झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नांदेड, भोकर, मुदखेड, उमरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देनांदेड : उमरी, मुदखेड, भोकर, नांदेड तालुक्यांत अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड/धर्माबाद : जूनमध्येच आगमन झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नांदेड, भोकर, मुदखेड, उमरी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४९.६७ मि.मी. पावसाची नोंद झाली. बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरण काठोकाठ भरले आहे. तसेच धरणात येणाऱ्या पाण्याचा ओेघ कायम आहे. त्यामुळे धोका लक्षात घेऊन पाटबंधारे खात्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले़ हे पाणी पुढे निजामाबाद जिल्ह्यातील पोचमपाड प्रकल्पात पोहोचले आहे.गेल्या २४ तासांत नांदेड तालुक्यात ७५.६३ मि.मी, मुदखेड ८२.६७ मि.मी, भोकर: ९२.७५ मि.मी तर उमरी तालुक्यात ६९.६९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्याच्या इतर तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धापूर ५८.६७, कंधार ४२.३३, लोहा ५७, किनवट २२़७१, माहूर २८, हदगाव ३५़५७, हिमायतनगर ३९़३३, देगलूर १५़५०, बिलोली ४६़२०, धर्माबाद ५७, नायगाव ५०़८० आणि मुदखेड तालुक्यात २०़८६ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात १७१़ २० मि़मी़ पावसाची नोंद झाली़ दरम्यान, रविवारी झालेल्या अतिवृष्टीने भोकर तालुक्यातील हाडोळी, पोमनाळा, कोळगाव खु. येथे घरांची पडझड झाली. भोसी परिसरात ताटकळवाडी शिवारात केळीचे नुकसान झाले़ अतिवृष्टीमुळे धारजनी येथे घराची भिंत पडून १२ वर्षाचा बालक दगावला तसेच अनेक घराची पडझड झाली आणि वीज पडून गाय दगावली आहे.परभणीत चौथ्या दिवशीही हजेरीच्परभणी : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, रविवारी रात्रीही सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे़ पावसामुळे पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे.हिंगोलीत सरासरीच्या १६ टक्के पर्जन्यच्हिंगोली : यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच पाऊस झाला. त्यामुळे सरासरीच्या १५.९९ टक्के पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच कालावधीत अवघा ७.६५ टक्के पाऊस झाला होता. यंदा हिंगोली १४.८३ टक्के, वसमत-१८.९३, कळमनुरी १८.२८, औंढा नागनाथ-१३.९९, सेनगाव-१३.३३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडDamधरणRainपाऊस