शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

साडेपाच हजारांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST

चिकन फेस्टिव्हल हदगाव : तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याकडून आयोजित चिकन फेस्टिव्हलला प्रतिसाद मिळाला. बर्ड फ्लू जनजागृती अभियानांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात ...

चिकन फेस्टिव्हल

हदगाव : तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याकडून आयोजित चिकन फेस्टिव्हलला प्रतिसाद मिळाला. बर्ड फ्लू जनजागृती अभियानांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. आ. माधवराव जवळगावकर यांनी उद्घाटन केले. या वेळी साहाय्यक जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोधनकर, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, साहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. खुणे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. माधव लोकरे आदी उपस्थित होते.

ओमकार महाराजांचे कीर्तन

नरसीफाटा : नायगाव तालुक्यातील कामरसपल्ली येथील बाल कीर्तनकार ओमकार मनोहर महाराज यांचे वन्नाळी, ता. देगलूर येथे २३ फेब्रुवारी रोजी कीर्तन घेण्यात आले. वन्नाळी येथे २२ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह घेण्यात येत आहे. या अंतर्गत ओमकार महाराजांचे कीर्तन झाले.

भाजीपाला कवडीमोल दराने

हदगाव : हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा, पळसा, मनाठा, बामणीफाटा, चिंचगव्हाण, शिबदरा परिसरात कवडीमोल दराने भाजीपाल्याची विक्री होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व बोअरवेलची सोय आहे, अशांनी शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाला लावला. मात्र या भाजीपाल्याला अल्पदर मिळत आहे.

उमरी येथे रमामाता जयंती

उमरी : यशवंत कॉलनी काश्यप बुद्धविहार उमरी येथे रमाई महिला मंडळाच्या वतीने रमाई जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मंडळाच्या अध्यक्षा जयाबाई जोंधळे यांनी ध्वजारोहण केले. सायंकाळी जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी युवराज मोरे, लता शिंदे, बी.एल. शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अध्यक्षा जयाबाई जोंधळे, उपाध्यक्ष सुनंदा कांबळे, सचिव यशोदा जोंधळे, कोषाध्यक्ष जयश्री वाघमारे, सल्लागार सुनंदा धडके आदींनी परिश्रम घेतले.

माळाकोळी येथे फिरते लोकअदालत

लोहा : तालुक्यातील माळाकोळी येथे फिरते लोकअदालत कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून मोबाइल व्हॅन आली होती. या वेळी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश पॅनलप्रमुख कमल वडगावकर, कर्मचारी वसंत वडजे, मिरजकर, कापसे, चंपत शिंदे, माळाकोळीच्या सरपंच वैष्णवी सूर, ग्रामविकास अधिकारी एस.एस. धुळगंडे, विस्तार अधिकारी भोसले, फौजदार माणिक डोके आदी उपस्थित होते.

नदीत बुडून मृत्यू

अर्धापूर : आसना नदीच्या पात्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी घडली. शेख अरबाज शेख रज्जाक (वय १५) हा मित्रांसोबत आसना नदीवर पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेख मदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली.

शहराध्यक्षपदी जलील पठाण

मुक्रमाबाद : ऑल इंडिया तंजीम ए इन्साफ संघटनेच्या शहराध्यक्षपदी जलील पठाण यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी शफी कुरेशी, सचिव असीफ शेख, सहसचिव असलम पठाण, कोषाध्यक्ष शेख सोहेल, सल्लागार शेख मुस्तफा, कार्याध्यक्ष जलील पटेल, तर सदस्य म्हणून मन्यार मस्तान, शेख अजहर, शेख अब्दुल, मुशरफ तांबोळी, गौस चौधरी, शेख मेहबुब यांची निवड झाली.

रक्तदान शिबिर

हदगाव : हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर २२ रोजी घेण्यात आले. या वेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. कार्यक्रमासाठी राहुल वाघमारे, नामदेव पांचाळ, गणेश चौधरी, ऋतुजा कदम, ज्योती रामुलवाड, ज्ञानेश्वर शिरडकर, उद्धव मुळे आदींनी परिश्रम घेतले.