शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आधी दारू पाजली, नंतर गळा चिरून दिले पेटवून; बाईक देत नसल्याच्या रागातून मित्राची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 19:46 IST

अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे उकलले गूढ

नांदेड :  बिलोली तालुक्यातील सगरोळी शिवारात काही दिवसांपूर्वी एका पुरुषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने या प्रकरणाचे गूढ उकलले. मित्राने दुचाकी न दिल्यामुळे त्याला दारू पाजून मित्रानेच खून केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणातील आरोपीला तेलंगणा सीमेवरील कार्ला चेकपोस्ट येथून अटक करण्यात आली.

८ नोव्हेंबर रोजी सगरोळी शिवारातील जंगलात अर्धवट जळालेले पुरुषाचे प्रेत आढळले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला होता. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. द्वारकादास चिखलीकर यांनी तपासासाठी दोन पथके स्थापन केली होती. अर्धवट जळालेल्या प्रेताची ओळख अन् मारेकऱ्याला पकडणे, असे दुहेरी आव्हान पोलिसांसमोर होते. शास्त्रशुद्ध पद्धतीने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. 

१९ नोव्हेंबरला पोनि. चिखलीकर यांना मारेकरी महाराष्ट्र अन् तेलंगणा सीमेवरील कार्ला चेकपोस्ट येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेऊन महेंदर बोब्बासानी, रा. झेंडा गल्ली, मिर्झापूर जि. कामारेड्डी या आरोपीला अटक केली. अटकेनंतर खुनाबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता, त्याने धक्कादायक माहिती दिली. बोब्बासानी याने त्याचा मित्र गणेश व्यंकय्या चंचू, रा. नसरुल्लाबाद याला दुचाकी मागितली होती; परंतु त्याने दुचाकी देण्यास नकार दिला. त्याचा राग मनात ठेवून बोब्बासानी याने चंचू याला दारू पाजली. त्यानंतर सगरोळीच्या जंगलात त्याला आणले. या ठिकाणी त्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केले, तसेच डोक्यावर हेल्मेट मारून त्याचा खून केला. पेट्रोल टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला; परंतु चंचू यांचा मृतदेह अर्धवट जळाल्याने त्याने तेथून काढता पाय घेतला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकात सपोनि पांडुरंग माने, पोउपनि सचिन सोनवणे, पोहेकॉ गुंडेराव करले, संजय केंद्रे, शंकर म्हैसनवाड, देवा चव्हाण, महेश बडगू, मोतीराम पवार, तानाजी येळगे, बजरंग बोडके, रवी बाबर, राजू सिटीकर, दीपक ओढणे, अच्युत मोरे, हेमंत बिचकेवार, दादाराव श्रीरामे यांचा सहभाग होता. 

सीमावर्ती गावांमध्ये केली चौकशीअर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानंतर त्याच्याशी मिळती-जुळती व्यक्ती काही दिवसांपासून मिसिंग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीमावर्ती भागातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन, तसेच पोलिस ठाण्यांमध्ये चौकशी केली. सभोवतालच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले होते.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी