जिल्ह्यात पहिल्या टप्यात होणार ५०० पाणंद रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:31 AM2021-02-18T04:31:04+5:302021-02-18T04:31:04+5:30

या पूर्वी जिल्ह्यासाठी ३ कोटी रूपये प्राप्त झाले होते. त्यातून शेत, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार ...

In the first phase, 500 Panand roads will be constructed in the district | जिल्ह्यात पहिल्या टप्यात होणार ५०० पाणंद रस्ते

जिल्ह्यात पहिल्या टप्यात होणार ५०० पाणंद रस्ते

Next

या पूर्वी जिल्ह्यासाठी ३ कोटी रूपये प्राप्त झाले होते. त्यातून शेत, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून कच्चा रस्ता तयार करण्याची कामे झाली आहेत. शेतकर्यांकडून तसेच गावकऱ्यांनी अजूनही शेत, पाणंद रस्ता तयार करण्याची मागणी होत आहे. याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ग्रामीण भागातील शेत, पाणंद, रस्त्यांची कामे करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांनी गावातील रस्त्याची माहिती तयार करून तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात सादर करावयाची आहे. त्यानुसार रस्त्यांची कच्चे, पक्के तसेच अतिक्रमित रस्ते अशी वर्गवारी करण्याचे काम संबधित तहसीलदा, गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाने अभियंता व भूमी अभिलेख विभागाचे तालुका निरिक्षक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी माहिती जिल्हाधिकारी यांना सादर करायची आहे. यानंतर जिल्हास्तरीय समिती रस्त्यांच्या कामाबाबत निर्णय घेणार आहे. ही कामे मनरेगा तसेच अन्य योजनेतून करण्यात येणार आहेत. सदरील माहिती फेब्रुवारी अखेरपर्यंत सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिल्या आहेत.

Web Title: In the first phase, 500 Panand roads will be constructed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.