शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

अटलबिहारी वाजपेयींचा पक्षवाढीसाठी १९८२ मध्ये पहिला नांदेड दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:51 AM

भाजपा स्थापनेचा दोन वर्षानंतर पक्ष वाढीसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नांदेडमध्ये १९८२ मध्ये पहिली जाहीर सभा घेतली होती. पक्ष कार्यासाठी तत्कालीन भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीन लाखांची थैलीही वाजपेयी यांना भेट दिली होती. भाजपाची स्थापना १९८० मध्ये झाल्यानंतर पक्षवाढीसाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी देशभर दौरे काढले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भाजपा स्थापनेचा दोन वर्षानंतर पक्ष वाढीसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नांदेडमध्ये १९८२ मध्ये पहिली जाहीर सभा घेतली होती. पक्ष कार्यासाठी तत्कालीन भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीन लाखांची थैलीही वाजपेयी यांना भेट दिली होती.भाजपाची स्थापना १९८० मध्ये झाल्यानंतर पक्षवाढीसाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी देशभर दौरे काढले होते. याच दौ-याअंतर्गत नांदेडमध्ये १९८२ मध्ये ते पहिल्यांदा आले होते. पक्षवाढीचे उद्दिष्ट्य ठेवून त्यांनी चिखलवाडी येथील उदासी मठ मैदानावर जाहीर सभाही घेतली. या सभेत तत्कालीन भाजपा पदाधिका-यांनी वाजपेयी यांना पक्ष कार्यासाठी तीन लाखांची आर्थिक मदतही केली होती. यामध्ये तत्कालीन आ. चंद्रकांत मस्की, गणपतराव राऊत आदींचा समावेश होता. पक्षवाढीसाठी त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र येत निष्ठेने काम करण्याचा सल्ला दिला होता.सभेनंतर भाग्यनगर येथील डॉ. प्रभाकर पुरंदरे यांच्या निवासस्थांनी त्यांनी भोजन घेतले होते. डॉ. प्रभाकर पुरंदरे हे संघाचे कार्यकर्ते. त्यांचेही शिक्षणही लखनऊ येथे झाले होते. वाजपेयी यांचेही शिक्षण तेथेच झाल्याने त्या परिचयातून त्यांनी पुरंदरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी वेदप्रकाश गोयल यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मंजिरी पुरंदरे, अरुंधती पुरंदरे यांनी आदरातिथ्य केले होते. १९९६ आणि १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी प्रचार केला होता. भाजपाचे उमेदवार धनाजीराव देशमुख यांच्या प्रचारासाठी त्यांनी नांदेडमध्ये सभा घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान एका आंदोलनासंदर्भात अटलबिहारी वाजपेयी यांचे वाजेगाव येथेही एक सभा झाली होती. प्रशासनाने शहरात वाजपेयी यांच्या सभेला परवानागी न दिल्याने ही सभा वाजेगावमध्ये घेण्यात आली होती. या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. वाजपेयी यांच्या सभेला परवानगी नाकारण्याचा नांदेडला इतिहास आहे.---लखनऊच्या आठवणीत रमले अटलबिहारी१९८२ मध्ये नांदेडला पक्षाच्या प्रचार प्रसारासाठी आलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी दुपारचे जेवन भाग्यनगर येथील डॉ. प्रभाकर पुरंदरे यांच्या घरी घेतले. जेवनानंतर तेथेच सुमारे तासभर गप्पांचा फड रंगला. डॉ. पुरंदरे यांचे वैद्यकीय शिक्षण लखनऊ येथे झाले होते तर अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर पाचजन्य या साप्ताहिकांची जबाबदारी संघटनेने टाकलेली असल्याने त्यांचे लखनऊला येणे-जाणे होते. त्यामुळेच लखनऊ शहराविषयीच्या विविध आठवणी त्यांनी सांगितल्या. १९८२ मध्ये अटलबिहारी वाजपेयी नांदेडला आले, त्यापूर्वी दोन-तीन दिवस अगोदरच मध्यप्रदेश येथे त्यांच्या सभेवर दगडफेक झालेली होती. त्यामुळेसायंकाळी चिखलवाडी येथे झालेल्या जाहीर सभेत वाजपेयी यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांच्यावर जोरदार टीका केली.

 

टॅग्स :NandedनांदेडAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा