शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये गुरुद्वारा परिसरात गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:14 IST

शहरातील गुुरुद्वारा प्रवेशद्वार क्रमांक ५ समोर धूम्रपान करणाऱ्या तिघांना काही तरुणांनी हटकल्यानंतर त्यांनी स्वत:जवळील पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या़ घटनेनंतर आरोपी कारने पसार झाले

नांदेड : शहरातील गुुरुद्वारा प्रवेशद्वार क्रमांक ५ समोर धूम्रपान करणाऱ्या तिघांना काही तरुणांनी हटकल्यानंतर त्यांनी स्वत:जवळील पिस्तुलातून दोन गोळ्या हवेत झाडल्या़ घटनेनंतर आरोपी कारने पसार झाले असून पोलिसांनी त्यांचा भोकर फाट्यापर्यंत पाठलाग केला़ परंतु, ते हाती लागले नाहीत़ ही घटना शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली़गुुरद्वारा प्रवेशद्वार क्रमांक ५ समोर तेजिंदरसिंघ मोहनसिंघ, मोनूसिंघ गाडीवाले, राजिंदरसिंघ व गुरुप्रितसिंघ कारपेंटर हे चार तरुण थांबले होते़ त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर एका कारच्या शेजारी अन्य तीन अनोळखी तरुण उभे होते़ हे तरुण कारजवळ उभे राहून सिगारेट ओढत होते़ त्याचवेळी चार जणांनी त्यांना गुरुद्वारा परिसरात धूम्रपान करण्यास मनाई असल्याचे सांगितले़ तोच तिघांपैकी एकाने आपल्याजवळील बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या़ सुदैवाने या दोन्ही गोळ्या कुणालाही लागल्या नाहीत़ त्यानंतर चार तरुणांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़आवाजामुळे परिसरातील नागरिक घराबाहेर आले़ त्यामुळे घाबरलेल्या तिघांनी कारसह पलायन केले़ घटनेची माहिती पोलिसांना मिळताच लगेच शहरात नाकाबंदी करण्यात आली़ त्याचबरोबर इतवारा, भाग्यनगर, शिवाजीनगर, गुरुद्वारा सुरक्षापथकाच्या कर्मचाºयांनी कारचा पाठलाग केला़ भोकर फाट्यापर्यंत हा पाठलाग सुरु होता़परंतु आरोपी गुंगारा देवून पळून जाण्यात यशस्वी झाले़ पोलिसांकडून आता या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे़ आरोपीकडे असलेली गाडी ही हरियाणा पासिंगची असल्याची माहिती हाती आली आहे़ दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपअधीक्षक अभिजित फस्के, पोनि़सुनील निकाळजे, पोनि़ संदीप शिवले यांनी भेट दिली़

टॅग्स :NandedनांदेडSachkhand Gurudwara Nandedसचखंड गुरुद्वारा नांदेडFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस