शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड येथील उर्दू घराला उद्घाटनापूर्वीच आग; एसी चोरून नेताना शॉर्टसर्किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:07 IST

उर्दू भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी शहरातील देगलूर नाका परिसरात तब्बल आठ कोटी रुपये खर्च करुन उर्दू घर उभारण्यात आले़ परंतु राजकीय भांडणात अडकल्यामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले उर्दू घर जुगारी आणि मद्यपींचा अड्डा बनले होते़ त्यात मंगळवारी या ठिकाणी असलेल्या एका खोलीतील एसी चोरुन नेण्याचा प्रयत्न चोरट्याने केला असता, शॉर्टसर्कीटमुळे आग लागून खोलीतील साहित्य जळून खाक झाले.

नांदेड : उर्दू भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी शहरातील देगलूर नाका परिसरात तब्बल आठ कोटी रुपये खर्च करुन उर्दू घर उभारण्यात आले़ परंतु राजकीय भांडणात अडकल्यामुळे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले उर्दू घर जुगारी आणि मद्यपींचा अड्डा बनले होते़ त्यात मंगळवारी या ठिकाणी असलेल्या एका खोलीतील एसी चोरुन नेण्याचा प्रयत्न चोरट्याने केला असता, शॉर्टसर्कीटमुळे आग लागून खोलीतील साहित्य जळून खाक झाले.

नांदेड शहरात मुस्लिम बांधवांची संख्या लक्षणीय आहे़ त्यात देगलूर नाका भाग हा मुस्लिमबहुल म्हणून ओळखला जातो़ या भागात उर्दू घर उभारावे, अशी या भागातील नगरसेवकांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती़ त्यानंतर उर्दू घरसाठी विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला़ त्यातून तब्बल आठ कोटी रुपये खर्च करुन अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले उर्दू घर उभारण्यात आले़ यातील प्रत्येक खोलीमध्ये सोफा, फर्निचर, वातानुकूलित व्यवस्था करण्यात आली होती़ याच दरम्यान, या ठिकाणच्या अनेक साहित्याची चोरीही करण्यात आली होती़ याबाबत मनपाचे सभापती अब्दुल शमीम हे काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना भेटले होते़ त्यात मंगळवारी दुपारी उर्दू घरमधील एका खोलीत असलेली एसी चोरुन नेण्याचा प्रयत्न करण्यात आला़ यावेळी एसीचे वायर ओढल्याने शॉर्टसर्कीट झाला़ त्यामुळे खोलीला आग लागली़ आग लागताच चोरटा मात्र पसार झाला़ धुराचे लोळ पाहून परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले़ अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग विझविण्यात आली़, परंतु तोपर्यंत खोलीतील हजारो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले होते़ खोली आतून पूर्णपणे काळीकुट्ट पडली होती़ 

सुरक्षेचा प्रश्न कायममनपा निवडणुकीपूर्वी उर्दू घरचे उद्घाटन करण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली होती़ परंतु दोन विभागातील वादामुळे उद्घाटन रखडले होते़ त्यात सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी कुठल्याच उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या़ त्यामुळे दिवसा अन् रात्रीच्या वेळी या सुसज्ज वास्तुत पत्त्यांचे डाव रंगत होते़ वातानुकूलित खोल्यांमध्ये मद्यपींच्या पार्ट्याही रंगत होत्या़ उद्घाटनापूर्वीच अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या उर्दू घरची वाईट अवस्था झाली आहे.

टॅग्स :Nandedनांदेडfireआग