शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

माहुरात चक्क पाण्याच्या पाईपलाईनवर उभी राहतेय अग्निशमन इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:45 IST

हरातील पाणीपुरवठा परिसरात उभारण्यात येत असलेली अग्निशमन इमारत चक्क पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरच उभारली जात असल्याने पाईपलाईनसह एक कोटी रुपये खर्चाच्या इमारतीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत़

- इलियास बावाणीश्रीक्षेत्र माहूर (नांदेड ) :  शहरातील पाणीपुरवठा परिसरात उभारण्यात येत असलेली अग्निशमन इमारत चक्क पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवरच उभारली जात असल्याने पाईपलाईनसह एक कोटी रुपये खर्चाच्या इमारतीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत़शासनाकडून मिळालेल्या निधीतून अग्निशमन वाहन खरेदी करून एक वर्ष झाले मात्र वाहनांची अद्यापही पासिंग झाली नाही. प्रशिक्षित चालक, फायरमनची नेमणूक नाही़ वाहन तसेच वापरण्यात येत आहे़  शासनाकडून ९० लाख १२ हजार रुपये निधी मंजूर झाल्याने पाणीपुरवठा परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या बांधकामास आ़ प्रदीप नाईक यांच्या हस्ते २८ नोव्हेंबर २०१७ रोजी उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली होती़

गेल्या ३० वर्षांपूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी निर्माणनिधी इमारतीजवळ पाण्याची टाकी बांधून  पाईपलाईन टाकण्यात आली़ या पाईपलाईनवरून आजमितीस पैनगंगा नदीवरून पाणी येत आहे़ ही पाईपलाईन निर्माणाधीन इमारतीच्या मध्यभागी आल्याने इमारतीच्या खांबाची जागा बदलण्यात आल्याने खांब नको त्या ठिकाणी वाकडे झाल्याने अंदाजपत्रक चुकवून काम होत असल्याचा प्रकार सुरु आहे. 

कालबाह्य पाईपलाईन या इमारतीखालून गेल्याने लिकेज किंवा अर्धवट काम झाल्यानंतर काम निघाल्यास इमारत तोडून मेंटनन्स करणार काय? जुनी पाईपलाईन इमारतीच्या बाजूने जागा असताना का बदलली नाही? पाईप व इतर साहित्य असताना बाजूने पाईपलाईन का टाकली नाही? तसेच १० हजारांच्या खर्चासाठी स्ट्रक्चर बदलणारे ऩप़चे मुख्याधिकारी, अभियंते व कर्मचारी या कामात आणखी किती अनियमितता करतील याचा नेम नाही़ अनेक निर्माणाधीन इमारती कोसळतात़ त्याप्रमाणे येथे प्रकार घडल्यास नुकसान कोणाचे होणार?

निर्माणाधीन इमारतीच्या खाली असलेली पाईपलाईन काढून बाजूने टाकण्याची मागणी नगरसेवकांनी केली असून मुख्याधिकाऱ्यांसह संबंधितांवर कार्यवाही होणे गरजेचे आहे़  वेड्यावाकड्या पिल्लरवर ९० लाख रुपयांची इमारत तग धरेल काय? निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

काम परवानगीनेच होत आहे इमारतीखाली असलेली पाईपलाईन कालबाह्य झाली असून लवकरच नवीन पाईपलाईन होणार आहे़ तसेच त्या पाईपलाईनचे स्पेअर पार्ट मिळत नसल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीने हे काम होत आहे - प्रतीक नाईक, प्रभारी नगर अभियंता, नगरपंचायत, माहूर 

टॅग्स :Nanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडnagaradhyakshaनगराध्यक्षNandedनांदेड