शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलमध्ये बिडीची ठिणगी पडल्याने आगीचा भडका; पती-पत्नीसह मुलाचा होरळून मृत्यू, देगलूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 20:56 IST

देगलूर तालुक्यातील बल्लूर येथील शेतमजूर सुरेश बिरादार फवारणी पंपामध्ये पेट्रोल भरत होते, यावेळी बिडीची ठिणगी पेट्रोलवर उडाल्याने आगीचा भडका उडाला. 

देगलूर (जि. नांदेड) : देगलूर तालुक्यातील बल्लूर येथे नागपंचमीच्या दिवशी एक मोठी दुर्घटना घडली होती. घरात असलेल्या पेट्रोलचा भडका उडाल्याने कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेत पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला.  

बल्लूर येथील शेतमजूर सुरेश बिरादार (वय ५२) हे दोन ऑगस्टला नागपंचमीच्या दिवशी घरात असलेल्या फवारणी पंपामध्ये पेट्रोल भरत होते, यावेळी बिडीची ठिणगी पेट्रोलवर उडाल्याने आगीचा भडका उडाला. यावेळी सुरेश बिरादार व त्यांची पत्नी गंगूबाई बिरादार (४६) हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यांना वाचविण्यासाठी मुलगा कपिल बिरादार (२१) आणि मुलगी स्वाती (१९) हे धावले. मात्र, यामध्ये हे दोघेही होरपळले गेले.

ही घटना समजताच गावातील नागरिकांनी या चौघांनाही देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामध्ये मुलगी स्वाती हिच्यावर देगलूरमध्येच प्राथमिक उपचार करण्यात आले. पती-पत्नी व मुलगा गंभीररीत्या भाजले असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवून उपचार केले जात होते. परंतु शुक्रवारी ५ रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान वडील सुरेश बिरादार व मुलगा कपिल बिरादार यांचा मृत्यू झाला. दुपारी त्यांच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात येऊन काही तास उलटले असताना याच दिवशी रात्री आठ वाजेदरम्यान गंगूबाई बिरादार याही मरण पावल्याची खबर गावात धडकली.

टॅग्स :fireआगNandedनांदेड