शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

बिलोलीतील इको टूरिझमच्या क्षेत्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:46 IST

येथील दत्त मंदिर टेकडीवर असलेल्या इको टूरिझम वनक्षेत्रातील तीन एकर परिसरात आग लागून झाडे-झुडुपे खाक झाली़ सदर आग लागण्याची घटना चार दिवसांपूर्वी झाल्याची माहिती येथून मिळाली़ दरम्यान, अज्ञात इसमाकडून हे कृत्य झाल्याची माहिती पुढे आली आहे़ सध्या येथे अजूनही पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे शोभिवंत झाडे, लॉन, फळबाग सुकून चालले आहेत़ वनतळे बांधण्यात आले; पण तेथे एक थेंबसुद्धा पाणी नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : येथील दत्त मंदिर टेकडीवर असलेल्या इको टूरिझम वनक्षेत्रातील तीन एकर परिसरात आग लागून झाडे-झुडुपे खाक झाली़ सदर आग लागण्याची घटना चार दिवसांपूर्वी झाल्याची माहिती येथून मिळाली़ दरम्यान, अज्ञात इसमाकडून हे कृत्य झाल्याची माहिती पुढे आली आहे़ सध्या येथे अजूनही पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे शोभिवंत झाडे, लॉन, फळबाग सुकून चालले आहेत़ वनतळे बांधण्यात आले; पण तेथे एक थेंबसुद्धा पाणी नाही़बिलोली शहरातील दत्त मंदिर टेकडीवर वनविभागाची ६३ एकर जमीन आहे़ आॅक्टोबर २०१५ मध्ये राज्य शासनाने वन विभागाकडून या परिसराला इको टुरीझमचा दर्जा दिला़ २०१५ ते २०२० या पाच वर्षांत जवळपास ४ कोटी रुपयांचे प्रावधान ठेवले़ दरवर्षी टप्याटप्प्याने अनुदान वर्ग करून कामे करण्यात येत आहेत़ मागच्या दोन वर्षांत येथे बऱ्याच प्रमाणात विकासकामे झाली़ अंतर्गत रस्ते, वनतळे, लॉन, शोभीवंत झाडे, नागरिकांना बसण्यासाठी लोखंडी बेंच, ठिकठिकाणी डस्टबीन, व्यायामाचे साहित्य, आकर्षक स्वागत कमान, पर्यटक सोयीसुविधा, संपूर्ण ६३ एकरला लोखंडी संरक्षक कवच, मनोरा, झाडांना ओटे, सोलार दिवे, शौचालय आदींचे निर्माण झाले आहे़ ही सर्व कामे वन विभागाकडून अजूनही सुरू आहेत़वनझाडे संरक्षण करणे हे महत्त्वाचे काम या विभागाकडे सोपविण्यात आले; पण पाण्याची सोय नसल्याने भयावह स्थिती निर्माण झाली आहे.पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली झाडे आता वाळून जात आहेत़ यातच चार दिवसांपूर्वी अज्ञात इसमाकडून या भागात आग लावण्याचा प्रकार झाला़ आग कशामुळे लागली हे येथील कर्मचाºयांनाही माहीत नाही़ कडाक्याच्या उन्हामुळे वाळलेली झाडे व पालापाचोळा असा तीन एकरचा परिसर जळून खाक झाला़ पर्यटन परिसर असलेला भाग पूर्णपणे भकास दिसत आहे़ गेट, वॉचमन असतानाही हे कृत्य कोणी केले हे कळायला मार्ग नाही़ अजूनही येथे विकासकामे सुरू आहेत; पण जबाबदार अधिकाºयांचे नियंत्रण व देखरेख नसल्यामुळे इको टुरीझम परिसराची पुरती वाट लागली आहे़आग विझवण्यासाठी वनरक्षक, पर्यटकांची धावपळआग विझवण्यासाठी वनरक्षकासह पर्यटकांनी धावपळ केली. दरम्यान, आग विझवताना वनसंरक्षक एल़ जी़ शिंदे हे कर्मचारी जखमी झाले व भाजल्या गेले़ २८ मार्चला दुपारी २ वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली व झपाट्याने पसरत गेली़ संपूर्ण परिसर व झाडे वाळलेली असल्याने आग वाढत गेली़ ज्यामध्ये पालापाचोळा व लहान-मोठी झाडे जळाली़ याबाबत वनसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे.- एम़एच़शेख, वनपाल, वनविभाग (फॉरेस्ट विभाग), बिलोली़

टॅग्स :fireआगtourismपर्यटन