शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चुकार्‍यांअभावी किनवटचे शेतकरी सापडले आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 19:02 IST

 तूर विक्री करुन सव्वा महिना लोटत असताना शेतकर्‍यांच्या तुरीचे चुकारे चुकते न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

किनवट (नांदेड ) :  तूर विक्री करुन सव्वा महिना लोटत असताना शेतकर्‍यांच्या तुरीचे चुकारे चुकते न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर आॅनलाईन नोंदणी केलेल्या १ हजार १९१ शेतकर्‍यांची तूर अद्यापही तोलाईच्या प्रतीक्षेतच आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती किनवटने नाफेडमार्फत  ७ फेब्रुवारी २०१८ पासून तूर खरेदी सुरु कली. आजपर्यंत १ हजार ३०९  शेतकर्‍यांनी ५ कोटी  ४२ लाख २ हजार ३७५  रुपये किमतीची ९ हजार ९४५.३९  क्विंटल तूर  खरेदी केली. खरेदी केलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामात साठवून  ठेवण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी २०१८  रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नाफेडमार्फत तूर खरेदीचा प्रारंभ झाला. प्रतिक्विंटल ५ हजार ४५० रुपये याप्रमाणे तुरीला भाव मिळू लागल्याने तूर नाफेडच्या  खरेदी केंद्रावर विकणे शेतकर्‍यांनी पसंद केले. २ हजार ५०० शेतकर्‍यांनी तूर खरेदीसाठी आॅनलाईन अर्ज केले. 

दररोज पन्नास, शंभर आॅनलाईन होतच आहेत. तूर ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था नाही. सरकारकडे पैसा नसल्याने तूर खरेदी संथगतीने करण्याच्या तोंडी सूचना दिल्या जात असल्याने शेतकर्‍यांची तूर विक्रीसाठी होणारी संकलन केंद्रावर होणारी गर्दी  व खेटे मारणे पाहता केंद्रचालक कमालीचे गोंधळात पडले आहेत. विक्रीतून मिळणार्‍या रकमेचा घरखर्च, उसनवारीची परतफेड व लेकीबाळीच्या लग्नकार्यासाठी करावी ही अपेक्षाच भंग पडली. किनवटला मोठ्या प्रमाणात तूर विक्री करु पाहणार्‍या शेतकर्‍यांनी आॅनलाईन  अर्ज केले, त्यांच्या  तुरीची तोलाई बाकी असतानाच बिलोली, धार्माबादला खरेदी झालेली तूर किनवट येथील वखर महामंडळाच्या गोदामात आणल्याने नांदेडच्या  गोदाम सोडून तूर किनवटला का आली? असा सवाल आहे. तूर खराब असल्याने नांदेडच्या गोदामचालकाने ती स्वीकारली नसल्याचे कळते,  मग किनवटला ती का स्वीकारली, असा सवाल आहे.  

आठ दिवसांत रक्कम मिळेलतूर खरेदीनंतर शेतकर्‍यांच्या चुकार्‍याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी सावंत (मुंबई) यांना वारंवार कळविले आहे. तशी विचारणाही केली आहे. आठ दिवसांत चुकार्‍याची रक्कम मिळेल- रवी तिरमनवार, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती 

आर्थिक कोंडी  झालीतुरीचे चुकारे मिळाले तर त्या पैशातून सालगडी ठेवावे व इतर खर्च भागवावा, अशी आशा होती. पण तूर विक्री करुन महिना लोटला तरी तुरीचे पैसे  न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली- सुभाष मुंडे, शेतकरी आंदबोरी (चि)

पैसे देण्याची मानसिकता नाहीतूर खरेदी  केल्यानंतर तुरीचे पैसे शेतकर्‍यांना वेळीच म्हणजे सात दिवसांच्या आत मिळायला पाहिजे होते. पण सरकारची वेळीच पैसे देण्याची मानसिकता नाही. चोहीकडून शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. लग्नसराईचे दिवस अन् हक्काचे पैसे  मिळण्यास विलंब होत असून कोणाकडे न्याय मागावा? - अनिल क-हाळे पाटील, सभापती कृउबा समिती किनवट

वेळीच तुरीचे चुकारे  द्यावे

अत्यल्प पावसामुळे कोणत्याच पिकाचे उत्पन्न समाधानकारक नाही. तूर विक्रीपोटीची रक्कम वेळीच हातात मिळेल, दैनंदिन व्यवहार चालविण्यात मदत होईल असे वाटले; पण रक्कम काही हातात पडली नाही. शासनाने वेळीच तुरीचे चुकारे शेतकर्‍यांना द्यावे- गोपाळ पाटील इस्लापूरकर.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसाNandedनांदेडagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र