शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांध भाजपाला सत्तेबाहेर खेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:17 IST

पंतप्रधानांचे काम असते देशातील शांतता, सौहार्द कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करुन धर्मांधता वाढविण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत.

ठळक मुद्देगुलाम नबी आझाद यांचे आवाहन काँग्रेसच्या पाठीशी रहा, हैदराबादी नेत्याला भुलू नका

नांदेड : पंतप्रधानांचे काम असते देशातील शांतता, सौहार्द कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करुन धर्मांधता वाढविण्याचे काम नरेंद्र मोदी करीत आहेत. त्यामुळे भाजपाच्या पराभवाचे प्रमुख ध्येय समोर ठेवून काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केले. बॅरिस्टर ओवेसींची वंचित आघाडी ही भाजपा सरकारलाच मदत करण्यासाठी उभी असल्याचे सांगत या हैदराबादी नेत्यालाही थारा देऊ नका, असे ते म्हणाले.काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. आझाद यांनी बुधवारी शहरातील पीरबुºहाणनगर आणि देगलूर नाका येथे प्रचारसभा घेतल्या. यावेळी मंचावर आ. डी.पी. सावंत, मालेगावचे आ. असिफ शेख, माजी महापौर अब्दुल सत्तार, सभापती फारुख अली खान, माजी सभापती मसूद खान, माजी उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, अ‍ॅड. बारी सिद्दीकी, अ‍ॅड. निलेश पावडे, शमीम अब्दुल्ला, इब्राहीम इनामदार, तौफीक साब आदींची उपस्थिती होती.कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे राजकारण जवळून पाहण्याची मला संधी मिळाली. निष्कलंक चारित्र्याचा धनी असलेल्या या नेत्याने आयुष्यभर धर्मनिरपेक्षता जोपासली. तीच विचारधारा खा. अशोकराव चव्हाण पुढे घेवून जात असल्याने खा. चव्हाणांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.विकासाची आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपाने मागील साडेचार वर्र्षात केवळ धर्मांधतेचे राजकारण केले. मुस्लिमधर्मीयांना जाणीवपूर्वक हीन वागणूक दिली. तसेच या समाजबांधवांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावरही गदा आणली. याच सरकारने तीन तलाक सारखा अत्यंत चुकीचा कायदा आणला. या कायद्याविरुद्ध काँग्रेसच्या वतीने संसदेत आम्ही आवाज उठविला. पूर्वी या देशात सहिष्णुतेचे वातावरण होते. काँग्रेसच्या विचारधारेमुळे अठरापगड जातीत आपलेपणा होता. मात्र नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने या विचारधारेवरच हल्ला चढविला आहे. खा. असोद्दीन ओवेसी सारखी मंडळीही धर्मा-धर्मात तेढ पसरवून एक प्रकारे भाजपाला मदत करण्याचेच काम करीत आहेत. त्यामुळे भाजपाबरोबरच ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही धडा शिकविण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.राहुल गांधी यांची धोरणे स्पष्ट आहेत. देशाला विकासाकडे घेवून जाणारे युवा नेतृत्व उभे राहिले आहे. अशावेळी काँग्रेसला बळकटी दिल्यास आपले उद्याचे भविष्य उज्ज्वल राहील, असा विश्वासही गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून उपस्थितांना दिला.मतविभाजनाचा भाजपाला फायदा नकोसर्वसामान्य अल्पसंख्याक समाजाचे जगणे मुश्किल करणाऱ्या भाजपाला सत्तेबाहेर खेचण्याचे उद्दिष्ट समोर ठेवा. आपली खरी लढाई फक्त धर्मांध भाजपा सरकारशी आहे. त्यामुळे ही लढाई लढताना धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार नाही आणि त्याचा फायदा पुन्हा भाजपाला मिळणार नाही, याची दक्षता घेण्याची आवश्यकता गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केली. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा