शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

पावसाची धास्ती; नांदेड बाजार समितीत एवढी हळद आली की मोजायला लागले दोन दिवस !

By प्रसाद आर्वीकर | Updated: May 10, 2023 19:44 IST

नांदेड बाजार समितीत सोमवारी विक्रमी २० हजार पोते हळदीची आवक झाली.

नांदेड : शेतात वाळण्यासाठी काढून ठेवलेली हळद अवकाळी पावसाने भिजत असून, यापुढेही पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या उघडीप मिळाल्याने उत्पादकांनी थेट बाजारपेठेचा रस्ता धरलाय. परिणामी, नांदेड बाजार समितीत सोमवारी विक्रमी २० हजार पोते हळदीची आवक झाली. ही हळद मोजण्यासाठी चक्क दोन दिवसांचा कालावधी लागला.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, धाराशिव या भागातूनही हळद उत्पादक माल विक्रीसाठी आणतात. सर्वसाधारणपणे या बाजार समितीत १० ते १२ हजार हळदीचे कट्टे दाखल होतात. त्यांची एकाच दिवशी मोजणीही केली जाते. दरम्यान, अवकाळी पावसाने उघडीप दिल्याने सोमवारी नांदेड बाजार समितीत हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. एकाच दिवशी २० हजारांच्या जवळपास हळदीचे कट्टे दाखल झाले आहेत. त्यापैकी ६० वाहनांचे बिट सोमवारी होऊ शकले नाही. सकाळी दहा वाजता सुरू झालेले बिट सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालले, अशी माहिती नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव साहेबराव बाऱ्हाटे आणि एम. पी. पाटील यांनी दिली.दरम्यान, नांदेड बाजार समितीतील वाढणारी हळदीची आवक लक्षात घेऊन बाजार समिती प्रशासनाने हळद घेऊन येणाऱ्या उत्पादकांना कोणताही त्रास होऊ नये याचे नियोजन केले असून, सोमवारी ज्यांचे बिट झाले नाही त्यांचे नियोजन मंगळवारी करण्यात आले.

मंगळवारी मिळाला ९ हजारांचा दरनांदेड बाजार समितीत मंगळवारी देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. दिवसभरात ८ हजार पोते हळदीची आवक झाली. मंगळवारी झालेल्या बिटावर हळदीला ९ हजार रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला असून, कमीत कमी ५५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दिवसभरातील सरासरी दर ६५०० रुपये दर मिळाला आहे, असे बाजार समितीचे सांख्यिकी अधिकारी रवींद्र कल्याणकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडMarket Yardमार्केट यार्ड