शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाइन परीक्षेची धास्ती; पेपर हातात पडताच चौथीतील मुलाला फुटला घाम,झाला अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 13:27 IST

शाळेत जाण्याच्या नावानेच त्याला धडकी भरत आहे. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

- शिवराज बिचेवारनांदेड- कोरोनामुळे गेले दोन वर्षे ऑफलाइन अभ्यासक्रम घेण्यात आला. त्यात जानेवारीमध्ये काही दिवसांसाठी शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ओमायक्रॉनमुळे त्या बंद केल्या होत्या. परंतु शाळा सुरु होताच ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी किती आत्मसात केला, याची चाचपणी घेण्यासाठी चौथीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु हातात पेपर पडताच चौथीतील मुलाला घाम फुटला आणि तो अत्यवस्थ झाला.

शाळेत जाण्याच्या नावानेच त्याला धडकी भरत आहे. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांकडून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइनच्या घोळामुळे शैक्षणिक क्षेत्राचे वाटोळे झाले आहे. बारावीचा तर ८० टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन घेण्यात आला अन् परीक्षा ऑफलाइन होणार असल्याची घोषणा होताच संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. चिमुकल्यांच्या मानसिकतेवर त्यापेक्षा वाईट परिणाम झाला आहे. चौथीतील रुद्र (नाव बदलले) हा शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी पेपर सोडविण्यास त्याला सांगितले. परंतु, पेपर हातात पडताच इतर काही मुले रडायला लागली, तर रुद्रला दरदरुन घाम येऊन तो अत्यवस्थ झाला. लगेच पालकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयातून घरी आल्यानंतरही तो शाळेत जाण्याच्या नावानेच थरथर कापत होता. सारखे बडबडायचा, मी नापास होणार, मला काहीच येत नाही. त्यामुळे काळजीत पडलेल्या पालकांनी मानसोपचारतज्ज्ञाकडे त्याच्यावर उपचार सुरु केले. औषधोपचारानंतर त्याची मानसिकता बदलत आहे. परंतु, अद्यापही अभ्यास अन् शाळा हे विषय काढताच तो भीतीच्या सावटाखाली जातो. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचे गंभीर परिणाम आता दिसून येत आहेत.

ऑनलाइनमुळे संवाद हरविलाऑनलाइन अभ्यासक्रमामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवाद हरवला. शाळेत शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर संपूर्ण वर्गासमोर द्यावे लागत होते. त्यातून विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी होण्यास मदत होत होती. चुकले तर मुले हसत होती. त्यामुळे मनातील भीती कमी होत होती. परंतु, ऑनलाइनमुळे या सर्वांना ब्रेक बसला. दोन तास बसून पेपर सोडविण्याची सवयही मोडली. त्यामुळे जसजशा शाळा ऑफलाइन होतील, तसतसे मानसिकतेतील बदल पुढे येतील. - डॉ.रामेश्वर बोले, मानसोपचारतज्ज्ञ

खेळतो पण शाळेच्या नावानेच घाबरतोरुद्र हा गेले दोन वर्षे ऑनलाइन अभ्यासक्रम करीत होता. वाट्टेल तेव्हा दांडी मारत होता. परंतु, आता शाळेत जाण्याचे नाव काढले तरी, एकदम घाबरुन जातो, रडायला लागतो. मी नापास होणार, असे बडबडतो. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांकडे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. - रुद्रचे पालक

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या