शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

एफडीएची रसायनमिश्रीत फळ विक्रेत्यांवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:00 IST

सध्या कोणत्याही ऋतूत कोणतीही फळे मिळत आहेत़ त्यातच उन्हाळ्यात पाणीदार फळांसह आंबा, द्राक्ष या पिकांवर कॅल्शियम कार्बाइड वापरून ती लवकर पिकवून विकली जातात़

नांदेड : सध्या कोणत्याही ऋतूत कोणतीही फळे मिळत आहेत़ त्यातच उन्हाळ्यात पाणीदार फळांसह आंबा, द्राक्ष या पिकांवर कॅल्शियम कार्बाइड वापरून ती लवकर पिकवून विकली जातात़ त्यामुळे सदर फळे आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अशा फळविक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे़दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत असून फळांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे़ ग्राहकांची मागणी तेवढा पुरवठा होत नसल्याने टरबुजासह आंबे, द्राक्ष पिकविण्यासाठी केमिकल वापरल्या जात असल्याच्या तक्रारी एफडीएकडे प्राप्त झाल्या आहेत़ व्यापाऱ्यांनी ग्राहकांच्या आरोग्याला बाधा पोहोचेल, असे केमिकल, कॅल्शियम कार्बाइड वापरून पिकवलेली फळे विक्री करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे़ रसायनमिश्रीत फळे विक्री केल्यास कठोर शिक्षा होवू शकते़ त्यामुळे व्यापाऱ्यांनी अशा पद्धतीच्या फळांची विक्री करू नये़जिल्ह्यात ३० ते ३५ ठिकाणी रायपनिंग चेंबर्स असून त्याचा उपयोग करून फळे, केळी पिकवावीत़ जेणेकरून ग्राहकांच्या आरोग्याला धोका उद्भवणार नाही आणि व्यापारी, विके्रत्यांचेही हित जोपासले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे़कार्बाईड गॅसऐवजी इथेपॉन पावडरचा वापर करावा

  • अन्नसुरक्षा व मानदे कायद्याच्या तरतुदीनुसार कार्बाइड गॅस (कॅल्शियम कार्बाइड) च्या वापरास प्रतिबंध असून त्याचा वापर करुन आंबे पिकविल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
  • आंबा पिकविण्यासाठी इथेपॉन पावडर (इथेलीन गॅस) चा मर्यादित स्वरुपात वापर करण्याबाबत दिल्लीच्या भारतीय अन्नसुरक्षा व मानदे प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. सदर पावडर वापरताना ती फळांच्या (आंब्याच्या) प्रत्यक्ष संपर्कात येणार नाही याची दक्षता फळ विक्रेत्यांनी घ्यावी. हे पावडर एका आवरणात छोट्या स्वरुपात पॅक करुन फळाच्या (आंब्याच्या) ठिकाणी ठेवावे, जेणेकरुन आंबा पिकविण्यास मदत होईल. अशाप्रकारच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाल्या आहेत़
  • उत्पादक, व्यापाऱ्यांनी नैसर्गिकरित्या आंबा किंवा इतर फळे पिकवण्यासाठी प्राधान्य द्यावे़ फळे व भाजीपाला विक्रेते कमिशन एजंट, वाहतूकदार यांनी अन्नसुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
टॅग्स :NandedनांदेडfruitsफळेFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग