बिलोली/धर्माबाद : आदिवासी मन्नेरवारलू जमातीचे प्रमाणपत्र प्रकरणे निकाली काढण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी राष्टÑीय आदिवासी मन्नेरवारलू कल्याण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धर्माबाद येथील उपविभागीय अधिकारी व बिलोली तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.धर्माबाद उपविभागीय अधिकारी कार्यालयाने गेल्या अनेक वर्षांपासून समाजाला जात प्रमाणपत्र दिले नाही. जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. उपोषणाची दखल घेवून उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी नियमानुसार जात प्रमाणपत्र दिले जाईल, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येतील, असे लेखी पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.उपोषणात तालुकाध्यक्ष विठ्ठलराव कोंडलवाडे, सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी पोतन्ना लखमावाड, माजी नगरसेवक बोल्लमवाड नारायण, दत्तात्रय तोटावाड, विलास वरंगठवार, राजू दलालवाड, दारमोड व्यंकटराव, धर्मन्ना लखमावाड, गंगाधर सावकार गोसकूलवाड, अशोक रामोड, पञकार पोतन्ना लखमावाड, पोशट्टी भंडरवाड, गंगाधर जल्लोड, इरन्ना कोंडलवाडे, गजानन रामोड सहभागी झाले होते.दरम्यान, बिलोली येथील उपोषणात इतवंत पुपूलवाड, विलास पल्लेवाड, बालाजी कंधारे, जयप्रकाश माळी, नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार, नबाजी नलमेलवार, लिंगूराम ठक्करोड, बळीराम इरलेवाड, गंगाधर पपूलवाड, राजाराम कसलोड, शंकर कलमुर्गे, शंकर भुसेवाड, रमेश एन्लावार आदी सहभागी झाले होते.
मन्नेरवारलू समाजबांधवांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:25 IST
आदिवासी मन्नेरवारलू जमातीचे प्रमाणपत्र प्रकरणे निकाली काढण्यात यावे या व अन्य मागण्यांसाठी राष्टÑीय आदिवासी मन्नेरवारलू कल्याण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धर्माबाद येथील उपविभागीय अधिकारी व बिलोली तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
मन्नेरवारलू समाजबांधवांचे उपोषण
ठळक मुद्देजात प्रमाणपत्र वेळेत काढून वितरणाची केली मागणी