शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
2
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
3
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
4
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
7
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
8
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
9
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
10
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
11
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
12
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
13
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
14
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
15
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
16
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
17
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
18
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
19
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
20
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात ‘सेटलमेंट’ला शेतकऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:08 IST

राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली़ मागील वर्षभरापासून कर्जमाफीचे भिजत घोंगडे सुरू आहे़ दरम्यान, दीड लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस वनटाईम सेटलमेंट ही योजना आणली़ परंतु, भविष्यात सरसकट कर्जमाफी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी सेटलमेंट योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़

ठळक मुद्देकर्जमाफी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली़ मागील वर्षभरापासून कर्जमाफीचे भिजत घोंगडे सुरू आहे़ दरम्यान, दीड लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस वनटाईम सेटलमेंट ही योजना आणली़ परंतु, भविष्यात सरसकट कर्जमाफी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी सेटलमेंट योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आली़ आॅनलाईन अर्ज आणि विविध नियमांमुळे सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतक-यांना अडचणीचा सामना करावा लागला़ परंतु, कर्जमाफी झाल्याचा तसेच किती रक्कम झाली आदी सविस्तर माहिती वैयक्तिक मिळू लागल्याने शेतक-यांनी पारदर्शक कर्जमाफीबदल समाधान व्यक्त केले़येणा-या काळात सरसकट कर्जमाफी होईल, अशी अपेक्षा आजही शेतक-यांना आहे़ त्यामुळेच वनटाईम सेटलमेंट योजनेकडे शेतकरी पाठ फिरवित आहेत़ दरम्यान, जिल्ह्यात १ लाख ३५ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६९३ कोटी ९८ लाख रूपये जमा केले आहेत़ तर दीड लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतक-यांची संख्या २५ हजारांवर असून आजपर्यंत यातील मोजक्याच शेतक-यांनी ओटीएसचा लाभ घेतला आहे़ जवळपास २५ हजार ५९६ शेतक-यांकडे दीड लाखांपेक्षा अधिक असलेली रक्कम २२७ कोटी ८५ लाख रूपये आहे़आजपर्यंत किती शेतक-यांनी वनटाईम सेटलमेंट केली याचा आकडा जिल्हा अग्रणी बँकेकडे उपलब्ध नाही़ ओटीएससाठी शेतकऱ्यांप्रमाणेच बँकांदेखील उदासीन असल्याचे चित्र आहे़---बळीराजाला सरसकट कर्जमाफीची अपेक्षा़़़एसबीआय बँकेच्या विविध शाखांमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मेळावे घेवून त्यांना ओटीएस योजनेतून दीड लाखांपेक्षा अधिक रक्कम भरून कर्जमाफीतील दीड लाख रूपयांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले़ एसबीआयच्या २१ हजार ६४३ शेतकऱ्यांपैकी केवळ ३१० शेतकऱ्यांनी दीड लाखांवरील रक्कम भरून कर्जमाफीचा लाभ घेतला आहे़ शेतकऱ्यांनी ३़९१ कोटी रूपये जमा केले़ शेतकरी अधूनमधून बँकांमध्ये चकरा मारून कर्जमाफीची माहिती घेत आहेत़ तर येणाऱ्यां लोकसभा, विधानसभा निवडणुकांपूर्वी सरसकट कर्जमाफी दिली जाईल, अशी अपेक्षा बहुतांश शेतकऱ्यांना असल्याने सेटलमेंटकडे शेतकरी दुर्लक्ष करीत आहेत़---शेतकऱ्यांना आवाहनशासनाच्या वतीने वनटाईम सेटलमेंटसाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे़ येत्या ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना वनटाईम सेटलमेंट योजनेचा लाभ घेता येईल़ त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर योजनेच्या माध्यमातून दीड लाखांवरील रक्कम भरून दीड लाख रूपये कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीbankबँक