शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

रबीचा विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 17:27 IST

किनवट तालुक्यातून केवळ दोन शेतकऱ्यांनी रबीचा पीकविमा भरला आहे़ 

ठळक मुद्दे१७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज विमा भरण्यासाठी ३१ डिसेंबरची मुदत

नांदेड : नैसर्गिक आपत्तीद्वारे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या पीकविमा योजनेचा लाखो शेतकरी दरवर्षी फायदा घेत आहेत़ परंतु, यंदाच्या रबी हंगामातील पिकांचा विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी कानाडोळा केल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात केवळ १६ हजार ९३० शेतकऱ्यांनीच अर्ज केले आहेत़ 

राज्यात रबी हंगाम २०१९ -२० या वर्षाकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे़ प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी बंधनकारक असून बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत मंगळवार, ३१ डिसेंबर असून शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारण्याचे काम सध्या सुरू आहे़  

जिल्ह्यात आजपर्यंत १६ हजार ९३० शेतकऱ्यांनी रबीच्या पिकांसाठी विमा भरला आहे़ यामध्ये सर्वाधिक मुखेड तालुक्यातील ८ हजार ६६२ शेतकऱ्यांनी पीकविमा भराला आहे़ त्यापाठोपाठ नायगाव तालुक्यातील ४ हजार ७१५ शेतकऱ्यांनी, देगलूर तालुक्यातील २ हजार ९२ शेतकऱ्यांनी, बिलोली - ७२५, हदगाव - ३१८, अर्धापूर - १५३, नांदेड तालुक्यातील ११४, कंधार तालुक्यातील ८५, लोहा - ३१, धर्माबाद - ११, मुदखेड - ८, हिमायतनगर तालुक्यातील ८ शेतकऱ्यांनी, भोकर तालुक्यातील ६ तर किनवट तालुक्यातून केवळ दोन शेतकऱ्यांनी रबीचा पीकविमा भरला आहे़ सदर योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येत आहे़ रबी हंगामातील पिकासाठी दीड टक्के ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. 

या योजनेंतर्गत विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे़ पीक- गहू बागायती- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी ३५ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ५२५ रुपये, विमा लागू असलेले तालुके नांदेड (सर्व महसूल मंडळ). अधिसूचना तालुकास्तरीय कंधार, लोहा, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, नायगाव, भोकर. ज्वारी- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी २६ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ३९० रुपये, विमा लागू असलेले तालुके बिलोली, धर्माबाद, मुखेड (सर्व महसूल मंडळ), अधिसूचना तालुकास्तरीय- देगलूर, नायगाव, नांदेड, किनवट, हदगाव. हरभरा- विमा स्वंरक्षित रक्कम हेक्टरी २४ हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ३६० रुपये, विमा लागू असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, देगलूर, मुखेड, किनवट (सर्व महसूल मंडळ). अधिसूचना तालुकास्तरीय नायगाव, हिमायतनगर, मुदखेड या तालुक्यांना विमा लागू असेल. ही योजना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी- मार्फत राबविण्यात येत आहे़ दरम्यान, विमा भरण्यासाठी ३१ डिसेंबर ही अखेरची मुदत असल्याने शेतकऱ्यांनी विविध बँकांसमोर गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे़ त्यामुळे उर्वरित दिवसात विमाधारक शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे कृषि विभागाने सांगितले़ 

अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावारबी पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणीपश्चात नुकसान आदी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बागायती गहू, ज्वारी (जि), हरभरा या पिकासाठी ही योजना लागू आहे.रबी हंगामातील लागू असलेल्या पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवावा़ या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या बँकेशी किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आऱ बी़ चलवदे यांनी केले आहे़ 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती