शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

इसापूरच्या पाण्यासाठी शेतकरी धडकले तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:14 IST

शेतक-यांचे शिष्टमंडळ मंगळवारी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर धडकून, पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी तहसीलदार आशिष बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़

ठळक मुद्देपैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणीशेतकऱ्यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नआम्हा नदीकाठावरील लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय

हिमायतनगर : इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाने वाहती राहणारी पैनगंगा नदी कोरडीठाक पडली आहे़ यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अनेकदा मागणी करूनही काहीच फायदा झाला नसल्याने शेतक-यांचे शिष्टमंडळ मंगळवारी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर धडकून, पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी तहसीलदार आशिष बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़नदीकाठावरील गावकºयांना व मुक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली़ यंदा वरिष्ठ पातळीवर पाणी भरपूर झाल्याने इसापूर धरण ७० टक्के भरले आहे़ त्यासाठी पाणी सोडून संबंधित भागातील बंधारे भरून देण्यात यावे, आम्ही नदीकाठावरील सर्व जनता दरवर्षी पाण्यासाठी मागणी करत असतो़ परंतु कार्यालयातील अधिकारी हे तुम्हाला पाणी देता येणार नाही, असे सांगून पाण्यासाठी आलेल्यांवर अन्याय करीत आहेत़ जेव्हा इसापूर धरण भरले की नदीकाठावरील आम्हा शेतकºयांना सावधानतेचा इशारा देवून नदीपात्रात पाणी सोडतात़ यावेळी आमच्या शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान होते़ आणि पाण्याच्या त्यांच्या काळात आम्ही पाणी मागितले की आम्हाला पाणी देता येणार नाही, असे कारण सांगितले जाते़ पाणी जास्त सोडून आमच्यावर अन्याय आणि मागण्यासाठी आले तरीही आमच्यावर कायम अन्याय होत आलेला आहे़ ज्या लोकांचे नुकसान होत नाही, अशांना कालवे खोदून कोट्यवधींचा निधी खर्चून लाभक्षेत्रात घेवून पाणी सोडण्यात येते़ त्यामुळे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाकडून आम्हा नदीकाठावरील लोकांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे़ आम्ही शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाणीकर भरत असतानाही अन्याय केला जात असेल तर आम्ही सहन करणार नाही़ त्यामुळे नदीकाठावरील शेतकºयांच्या सिंचन व पाणीप्रश्नाकडे लक्ष देत शासनाने ठरविलेल्या दोन कालव्याप्रमाणे तिसरा कालवा पैनगंगा नदीस घोषित करून पाणीपाळ्याप्रमाणे नियमित पाणी देण्यात यावे, जर आगामी आठ दिवसांत पैनगंगा नदीत वारंग टाकळी येथील शेवटच्या टोकापर्यंत पाणी नाही सोडले तर लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषण करण्यात येईल, याची सर्व जबाबदाी प्रशासनावर राहील, वेळप्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल असा इशाराही देण्यात आला़सदर निवेदनाच्या प्रती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा़ राजीव सातव, जि़ प़ अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, आ़ नागेश पाटील, जिल्हाधिकारी व तहसीलदार हिमायतनगर यांना देण्यात आले आहे़ या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे, कृउबाचे सभापती गजानन तुप्तेवार, सुभाष राठोड, मदनराव पाटील, राजू पाटील भोयर, आबाराव पाटील, बळीराम देवकते, डॉ़ वानखेडे, किशनराव वानखेडे, नारायण पाटील, रामराव पाटील, विष्णु जाधव, अवधूतराव शिंदे आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपwater shortageपाणीटंचाई