शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत रोहित्रासाठी हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतले कोंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:53 IST

हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव येथील शेतक-यांनी विद्युत रोहित्रासाठी भोकरमध्ये असलेल्या विद्युत वितरण विभागीय कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांत समस्येचे तात्पुरते निवारण झाल्यामुळे वीज वितरण विभागाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर : हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव येथील शेतकऱ्यांनी विद्युत रोहित्रासाठी भोकरमध्ये असलेल्या विद्युत वितरण विभागीय कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांत समस्येचे तात्पुरते निवारण झाल्यामुळे वीज वितरण विभागाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.मागील महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त होत असताना शेतकऱ्यांना विंधन विहिरीवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र अनेक ठिकाणचे विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. यातच हिमायतनगर तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून जवळपास ३० विद्युत रोहित्र बंद अवस्थेत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी व प्रहार जनशक्ती पक्षाने वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना मागणी घातली होती. परंतु प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करुन वेळ मारुन नेली. यातच हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव, करंजी येथील शेतकऱ्यांनी अभियंता यांच्या सांगण्यानुसार बिल भरले. यानंतर प्रतीक्षा यादीप्रमाणे रोहित्र बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. खैरगावच्या क्रमांकापुढील गावांना रोहित्र देवून यांना ताटकळत ठेवले होते. याबाबत प्रत्येकवेळी विद्युत विभागाने दोन - तीन दिवसांचा अवधी देत महिना घालविला.यास कंटाळून बुधवारी सकाळपासून १२ शेतकऱ्यांनी भोकर येथील विद्युत वितरणच्या कार्यालयात तळ ठोकला. अखेर दुपारी सर्वजणांनी स्वत:ला कार्यालयातच कोंडून घेतले. दरम्यान, विद्युत विभागाचा एकही जबाबदार अधिकारी येथे हजर नव्हता हे विशेष. अखेर येथील पो.नि. आर.एस.पडवळ, पो.उपनि. सुरेश भाले, जमादार उमेश कारामुंगे यांनी पुढाकार घेवून आंदोलकांना शांत केले व खोलीच्या बाहेर काढल्याने तणाव निवळला.यावेळी शेतकऱ्यांना त्वरित एक विद्युत रोहित्र मिळाले. कोंडून घेतलेल्या आंदोलकांत प्रहारचे तालुकाध्यक्ष गजानन ठाकरे, प्रभाकर जाधव, रावसाहेब काकडे, खंडू येणेकर, मारोती पवळे, विश्वनाथ गजभरे, दीपक सावंत, दत्तराम टोमके आदीसह १२ जणांचा यावेळी समावेश होता. 

प्रहारचे आंदोलन चालूच राहणारविभागीय वीज वितरणमध्ये चालू असलेल्या अनागोंदी कारभाराविरुद्ध प्रहारकडून आंदोलन चालूच राहणार आहे. सकाळपासून आम्ही येथे असताना डी.पी. मिळाला नाही़ परंतु कोंडून घेताच दोन तासांत डीपी आला कोठून ?- गजानन ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रहार संघटना, हिमायतनगर.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagitationआंदोलन