शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांचे कुटुंब, बैलगाडीसह महावितरण कार्यालयात बस्तान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 18:38 IST

गेल्या आठ दिवसांपासून महावितरण प्रशासनाने विज पुरवठा बंद केला आहे.

अर्धापूर ( नांदेड ) : महावितरणने वीज पुरवठा तोडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी अर्धापूर येथील महावितरण कार्यालयात गांधीगिरीच्या मार्गाने शेतकऱ्यांनी सहपरिवार ठिय्या आंदोलन करून महावितरण प्रशासनाला धारेवर धरले आहे.

रब्बी हंगामाची पेरण्या झाल्या हवामानातील बदल, विविध अडचणींचा सामना करत कशीबशी पिके डोलत होती. गेल्या आठ दिवसांपासून महावितरण प्रशासनाने विज पुरवठा बंद केला आहे. शेतातील पिके कोमेजुन जात असल्याने व पिण्यासही पाणी नसल्याने अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकरी चिंतातुर अवस्थेत व्याकुळ झाला आहे. हाताला आलेली पिके जाऊ नये यासाठी बोअरवेल, विहीरीतील पाणी पिकांना देऊन जिवनदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा राहिल्याने अखेर कोंढा येथील शेतकऱ्यांनी आज गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. 

शेतकऱ्यांनी सहपरिवार बैलगाडी, जनावरे घेऊन अर्धापूर येथील महावितरणच्या कार्यालयात ठाण मांडले. आमच्यासह जनावरांची व्यवस्था करा म्हणत जनावरे कार्यालयातच बांधली. शेती नाही तर खाल माती अशा घोषणा ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात करण्यात आल्या. वीजपुरवठा बंद करून आघाडी शासन शेतकऱ्यांना निजामाप्रमाणे वागणूक देत आहे, अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, शेतकऱ्यांच्या ६ तासांच्या आंदोलनाला यश आले असून महावितरणने माघार घेत विद्युत पुरवठा पूर्ववत  सुरू करण्यात आला आहे. 

आंदोलनात गुणवंत हंगरगेकर, अँड किशोर देशमुख, अँड.बि.टी.पवार, धर्मराज देशमुख, शिवाजी पवार, बालाजीराव गव्हाणे, पप्पू पाटील, प्रल्हाद इंगोले, मुन्ना कदम, राम कदम, गणेश कदम, अँड.बालाजी कदम, रामराव कदम, अशोक कदम, माधवराव कदम, पप्पू कदम यांच्यासह हजारो शेतकरी व महिलांचा सहभाग होता.

टॅग्स :mahavitaranमहावितरणNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती