शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तीनवेळा नापास, आता जपानमध्ये तीन कंपन्या; नांदेडचा सुपूत्र ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 12:37 IST

Olympics 2020 : धर्माबाद येथील चैतन्य भंडारे यांनी तीन वेळा नापास होवूनही जिद्दीच्या जाेरावर ट्रक चालवून पैशाची जुळावाजुळव केली.

ठळक मुद्देनेहमीच मोठी स्वप्न पाहणाऱ्या या तरूणाने औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेज, भोपाळ, गोव्यात शिक्षण घेवून जपान गाठले.आईने आणि त्यांचे गुरू डी. डी. कुलकर्णी यांनी नेहमीच विश्वास दाखविला. त्यामुळे आपण यश संपादन करू शकलो

नांदेड : बारावीत तीन वेळा नापास झालेल्या धर्माबादच्या तरूणाने अटकेपार झेंडा फडकावला आहे. जपानमध्ये दोन कंपन्यांचा मालक असलेला चैतन्य भंडारे ( Chaitanya Bhandare ) हा तरूण सध्या टोकियोमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये ( Olympics 2020 ) भारतीय संघ आणि ऑलिम्पिक ऑर्गनाझेशन कमिटीमधील दुवा म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ( Failed three times, now three companies in Japan; Nanded's son links Indian team to Olympics) 

नांदेडच्या भूमिपुत्राचा प्रवास थक्क करणारा आहे. धर्माबाद येथील चैतन्य भंडारे यांनी तीन वेळा नापास होवूनही जिद्दीच्या जाेरावर ट्रक चालवून पैशाची जुळावाजुळव केली. नेहमीच मोठी स्वप्न पाहणाऱ्या या तरूणाने औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेज, भोपाळ, गोव्यात शिक्षण घेवून जपान गाठले. आईने आणि त्यांचे गुरू डी. डी. कुलकर्णी यांनी नेहमीच विश्वास दाखविला. त्यामुळे आपण यश संपादन करू शकलो असे भंडारे यांनी सांगितले. त्यांचे संशोधन पाहूनच जॅपनिज सरकारची मेक्स नावाची शिष्यवृत्ती मिळाली. संशोधन कार्यानंतर त्यांनी पाच वर्षे जपानध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. आवड असल्याने वालिंटियर ॲक्टिव्हीटीमध्ये सहभागी झालो. आपल्याच देशातील काही उद्योजकांनी कंपनी काढण्याचा सल्ला दिला. त्यानूसार कंपनी काढून विविध बिझनेस जोडले. याच कार्यामुळे सर्वांसोबत जोडला गेला आणि आज आपल्या भारतीय संघाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे तो अभिमानाने सांगतो.

१५ जुलैपासूनच संघाच्या सेवेतऑलिम्पिक स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी १५ १५ जुलैपासून चैतन्य भंडारे कार्यरत आहेत. त्यांच्यावर ऑलम्पिक ऑर्गनाझिंग टीम आणि भारतीय खेळाडूंमधील दुवा म्हणून स्वयंसेवकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे पार पाडत असताना प्रत्येक भारतीय खेळाडू, संघांस सेवा देण्याचे, त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले आहे.

पालकमंत्र्यांकडून चैतन्यचे कौतुकटोकोयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे मुख्य स्वयंसेवक जबाबदारी सांभाळल्यांतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी चैतन्य भंडारे यांचे कौतुक केले. चैतन्य भंडारे हे धर्माबादचे सुपूत्र आणि जपानमधील उद्योजक आहेत. रविवारी सायंकाळी पालकमंत्री चव्हाण यांनी ट्वीट करुन चैतन्य भंडारे यांचे अभिनंदन केले. मुख्य स्वयंसेवकाची भूमिका सक्षमपणे सांभाळल्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन. एक नांदेडकर म्हणून आम्हाला चैतन्याचा अभिमान आहे. प्रतिकुल परिस्थितीत चैतन्य यांचे जपानपर्यंत पोहचणे आणि मायदेशासाठी येथेही योगदान देणे प्रेरणादायी असल्याचे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021AurangabadऔरंगाबादNandedनांदेडNagsen vanनागसेन वन