शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:28 IST

जिल्ह्यात २०१८ च्या खरीप हंगामात पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे़ त्याच वेळी कपाशीच्या पे-यात मात्र अल्प प्रमाणात घट होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे़ गतवर्षी बोंडअळीच्या हल्ल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते़ त्यामुळे ही घट अपेक्षित आहे़

ठळक मुद्देबोंडअळीचा हल्ला : कपाशीच्या पेऱ्यात यंदा घट होण्याचा कृषी विभागाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात २०१८ च्या खरीप हंगामात पेरणीक्षेत्र वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे़ त्याच वेळी कपाशीच्या पे-यात मात्र अल्प प्रमाणात घट होईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे़ गतवर्षी बोंडअळीच्या हल्ल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते़ त्यामुळे ही घट अपेक्षित आहे़जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र हे १० लाख ३३ हजार १०० हेक्टर आहे़ त्यात गतवर्षी खरीप हंगामात ७ लाख ७६ हजार ६६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती़ तर रबी हंगामातही १ लाख ६८ हजार १२७ हेक्टर क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती़ गतवर्षी झालेल्या खरीप हंगामाच्या लागवडीत सर्वाधिक लागवड नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया सोयाबीन पीकाची झाली होती़ जिल्हयात ३ लाख १७ हजार ९५७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली होती़ यंदाही सोयाबीनच्या पेºयाचे प्रमाण तितकेच राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे़ खरीप ज्वारीच्या लागवडीतही यंदा मोठी वाढ अपेक्षित धरली आहे़ गतवर्षी ६१ हजार ४९८ क्षेत्रात ज्वारीची लागवड झाली होती़ यंदा ती १ लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रात ज्वारीची पेरणी होईल अशी अपेक्षा आहे़ तुरीच्या पेºयातही गतवर्षीच्या प्रमाणात थोडी घट अंदाजित धरली आहे़गतवर्षी जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाची लागवड झाली होती़ यंदा त्यात घट होईल असा अंदाज कृषी विभागाने केला आहे़ २ लाख ५० हेक्टर क्षेत्रात कापूस लागवडीची तयारी होत असल्याचा अंदाज वर्तविला आहे़जिल्ह्यात कापूस पिकाचे सर्वसाधरण क्षेत्र ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टर इतके आहे़ यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे संभाव्य कापूस लागवडीसाठी वापरात येईल अशी अपेक्षा आहे़ या पेरणीसाठी आवश्यक बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख ५३ हजार इतकी आहे़ त्यामध्ये बीटी कापूस बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख २८ हजार इतकी आहे़ त्यामध्ये बीजी-२ बियाणे हे १२ लाख १८ हजार तर बीजी-१ बियाणे हे १० हजार अपेक्षित आहे़ नॉन बीटी बियाणांच्या पाकिटांची संख्या ही २५ हजार अपेक्षित आहे़२०१७-१८ मध्ये ७६ हजार ९९५ मे़टन खत शिल्लक आहे़ त्याच वेळी खरिपासाठी १३ हजार ५६० मे़टन उपलब्ध झाले आहे़ त्यातील ३ हजार ५७२ मे़टन खताची विक्री आतापर्यंत झाली असून ८६ हजार ९८३ मे़टन खत अद्यापही शिल्लक आहे़ यामध्ये युरीया, डी.ए़पी़, एम़ओ़पी़, एऩपीक़े़, एस़एस़पी़, ए़एस़, एस़ओ़पी़ खत प्रकारांचा सामवेश आहे़जिल्ह्यात अनुदानीत रासायनीक खतांची विक्रीही डी.बी़टी़ अर्थात थेट लाभ हस्तांतरण प्रकल्पाअंतर्गत होत आहे़ शेतकºयांना एम़आऱपी़ दरानेच खताची विक्री करणे बंधनकारक आहे़ शेतकºयांना खत खरेदी करताना आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे़ रासायनिक खतांच्या विक्रीवरील अनुदान संबंधित उत्पादक आणि पुरवठाधारकांना अदा केले जात आहे़ नांदेड जिल्ह्यासाठी व्हिजन टेक या कंपनीकडून ८४५ आणि अ‍ॅनॉलॉजिक्स कंपनीकडून १५९ असे १००४ पीओएस मशीन उपलब्ध करुन दिल्या आहेत़जिल्ह्यात बोगस बियाणे, खते विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर १ आणि तालुकास्तरावर १६ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ बियाणांच्या निवडीसंदर्भात शेतकºयांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे़ कृषी विभागाने ग्रामस्तरावर बैठका घेण्यात येणार आहे़ शेतकºयांनी सोयाबीन बियाणे घरचे वापरणे, बीज प्रक्रिया करणे, उगवण क्षमतेनुसार सोयाबीन बियाणांचा वापर करणे आवश्यक आहे़ बीटी कापूस बियाणा बाबत एकाच वाणाचा आग्रह न धरता इतर समतुल्य वाणाची निवड करावी अशी सूचना कृषी विभागाने केली आहे़जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी पुरेसे बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे़ ज्वारी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन आदी पिकांसाठी महाबीजचे ५४ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे़ खाजगी बियाणांचे प्रमाण २३ हजार ९१० क्विंटल इतके आहे़---कापसाचे क्षेत्र : ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टरजिल्ह्यात कापूस पिकाचे सर्वसाधरण क्षेत्र ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टर इतके आहे़ यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे संभाव्य कापूस लागवडीसाठी वापरात येईल अशी अपेक्षा आहे़ या पेरणीसाठी आवश्यक बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख ५३ हजार इतकी आहे़गतवर्षी जिल्ह्यात २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाची लागवड झाली होती़ यंदा त्यात घट होईल असा अंदाज कृषी विभागाने केला.शेतकºयांना खत खरेदी करताना आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे़ रासायनिक खतांच्या विक्रीवरील अनुदान संबंधित उत्पादक आणि पुरवठाधारकांना अदा केले जात आहे़---भौगोलिक क्षेत्र १० लाख ३३ हजार १०० हेक्टरबीटी कापूस बियाणाबाबत एकाच वाणाचा आग्रह न धरता इतर समतुल्य वाणाची निवड करावी अशी सूचना कृषी विभागाने केली आहे़ शेतकºयांनी खते, बियाणे आदी बाबत अडचणी अथवा तक्रारी असल्यास किसान संचार टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३४००० तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक ०२४६२-२३०१२३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा़जिल्ह्यात कापूस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख २३ हजार ७५३ हेक्टर इतके आहे़ यंदा अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे संभाव्य कापूस लागवडीसाठी वापरात येईल अशी अपेक्षा आहे़ या पेरणीसाठी आवश्यक बियाणांच्या पाकिटांची संख्या १२ लाख ५३ हजार इतकी आहे़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी