शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील पर्जन्यमापक यंत्रांची तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:17 IST

जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे मोहीम २८ मे पासून सुरू झाली असून गत दोन दिवसांत १८ पर्जन्यमापक यंत्राची तपासणी करण्यात आली़

ठळक मुद्देपथकाकडून आढावा चुकीच्या नोंदीमुळे आणेवारी काढण्यात येत होत्या अडचणी

नांदेड : जिल्ह्यातील महसूल मंडळस्तरावर स्थापित केलेल्या सर्व पर्जन्यमापक यंत्राचा आढावा घेण्याचे मोहीम २८ मे पासून सुरू झाली असून गत दोन दिवसांत १८ पर्जन्यमापक यंत्राची तपासणी करण्यात आली़जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथकही स्थापन करण्यात आले असून या पथकाने २८ मे रोजी कुंडलवाडी, बिलोली, धर्माबाद करखेली व जारीकोट तसेच २९ मे रोजी नांदेड येथील सात पर्जनमापक यंत्रासह विष्णूपुरी, पावडेवाडी, भोकर, किनी, पाळज, अर्धापूर, दाभड व मालेगाव येथील पर्जन्यमापक यंत्राची तपासणी केली़ महसूल मंडळातील सर्व पर्जन्यमापक यंत्र जागतिक हवामान निकषाप्रमाणे आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे़ जी यंत्रे सुुस्थितीत अथवा नादुरुस्त आहेत, ती दुरुस्त करण्याच्या सूचना पथकाकडून देण्यात येत आहेत़ पर्जन्यमापक यंत्राची देखभाल, पावसाची मोजमाप, त्याची योग्य पद्धत, संभाव्य चुका आदींबाबतची माहिती संबंधित पर्जन्य मोजणाºया कर्मचाºयाला देण्यात येत आहे़ भारतीय हवामान खात्याचे मॅट्रॉलॉजिस्ट ए.एम. पांडे, नांदेडचे हवामान निरीक्षक बी.एम. कच्छवे यांचा या पथकात समावेश आहे. पथकात अव्वल कारकून सुरेश पेदेवाड, लिपिक शंकर मगडेवार आणि विजय येमेकर यांचाही समावेश आहे.पर्जन्यमापकावरील चुकीच्या नोंदीमुळे शासनाला आणेवारी काढताना अडचणी येत आहेत़ पावसाच्या चुकीच्या नोंदीमुळे शासनाचे नियोजन कोलमडत आहे़ त्यासाठी पर्जन्याची शास्त्रीय पद्धतीने नोंद होण आवश्यक आहे़ अनेक मंडळातील पर्जन्यमापक यंत्राची दुरवस्था झाली आहे़ काही ठिकाणी पर्जन्यमापक बंद आवस्थेत आहेत़ तर काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पावसाच्या नोंदी घेतल्या जातात़ पर्जन्यमापक मोकळ्या जागेत आहे का, पर्जन्यमापक प्रमाणित आहे का, पाऊस मोजता येतो का, आदींची चौकशी पथकाकडून होत असल्याची माहिती हवामान निरीक्षक बालासाहेब कच्छवे यांनी दिली़ विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात नांदेड जिल्ह्यातच पर्जन्यमापक यंत्रांची पावसाळापूर्व तपासणी केली जात असल्याचेही कच्छवे यांनी सांगितले़

टॅग्स :NandedनांदेडweatherहवामानRainपाऊस