शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 08:32 IST

Agriculture News: केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ‘एनसीसीएफ’च्या वतीने कापसाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सहा कापूस खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

नांदेड - केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ‘एनसीसीएफ’च्या वतीने कापसाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सहा कापूस खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. परंतु दसऱ्याचा मुहूर्त गेल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर तरी कापसाची खरेदी सुरू होईल, असे वाटत असताना दिवाळीलाही पांढऱ्या सोन्याची खरेदी झालीच नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. 

केंद्र शासनाने या हंगामासाठी सर्वच खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत. त्यात कापसाला प्रतिक्विंटल ७१२१ ते ७५२१ याप्रमाणे भाव जाहीर केला आहे. जिल्ह्यात हमीभावाने कापूस खरेदीसाठी भोकर, धर्माबाद, हदगाव, कुंटूर, नांदेड व नायगाव ही सहा केंद्र सुरू केली आहेत; परंतु दसऱ्यानंतर दिवाळीचा सण गेला तरी अद्यापही कापसाची हमीभावाने खरेदी केलेली नाही; पण अनेक ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केली आहे. 

मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणीसाठी १३ खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, मूग, उडिदासाठी एकही शेतकरी पुढे आला नाही. कापसाचे केंद्र सुरू केले नसल्याने कापसाचे भाव पडण्याची भीतीही शेतकऱ्यांना आहे. 

‘सीसीआय’चे सहा खरेदी केंद्र  जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केलेली असली तरी यावर्षी ‘सीसीआय’मार्फत केवळ सहा खरेदी केंद्रच सुरू  करण्यात आले आहेत. त्यामध्ये भोकर, धर्माबाद, हदगाव, कुंटूर, नांदेड व नायगाव या केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय खासगी व्यापाऱ्यांकडून अनेक ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले असून, तेथे खरेदीही केली जात आहे; पण सध्यातरी कापसाला ६ ते ७ हजारांच्या आत भाव मिळत आहे.

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र