शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बदलते राजकारण! तेलंगणाची BRS महाराष्ट्रात, राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 17:25 IST

सिमावर्ती भाग तेलगु भाषिक असल्याने तेलंगणा राज्यातील सत्ताधारी पक्षाने या भागातून पक्षाचा विस्तार करण्यास एकवटला आहे.

भोकर (नांदेड) : तालुक्यातील किनी येथे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने वन व पर्यावरण राज्यमंत्री अमोल इंद्रकरण रेडी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्षाचा विस्तारीकरण सोहळा सुरु झाला आहे. भोकर विधानसभा क्षेत्रात भारत राष्ट्र समितीने एन्ट्री केल्याने विविध राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

तालुक्यांतील अधिकांश सिमावर्ती भाग तेलगु भाषिक असल्याने तेलंगणा राज्यातील सत्ताधारी पक्षाने या भागातून पक्षाचा विस्तार करण्यास एकवटला आहे. सिमावर्ती तेलंगणातील मुधोळ येथील आमदार जी. विठ्ठल रेड्डी, किनीचे माजी सरपंच नरसारेड्डी गोपीलवाड, तिरपत रेड्डी, नरसा रेड्डी, रामकृष्ण रेड्डी, महिपाल रेड्डी, बाशेट्टी राजेन्ना, बी. शामसुंदर, व्यंकटराम रेड्डी, गंगाचरण, गणेश जाधव, शंकर चव्हाण यांच्यासह  निर्मल, म्हैसा, कुबेर येथील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मंत्री ए. इंद्रकरण रड्डी म्हणाले की, भाजप सरकारने भारतियांची घोर निराशा केली आहे. अदानी - अंबानी यांच्या हाती उद्योग देण्याचा सपाटा लावला जात आहे. तेलंगणा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्यात येते, तसेच दोन हप्त्यांत १०  हजार रुपये देणारे पहिले राज्य आहे. पेन्शन योजना राबवून गोरगरीबांना दिलासा देण्यात येतो. अशा स्वरुपाच्या योजना देशात राबविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी बीआरएस पक्ष देशातील विविध राज्यात आपला विस्तार करीत आहे. दरम्यान, किनी येथे मंत्री इंद्रकरण रड्डी यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी अनेकांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. परिसरातील अनेक गावांचे नागरिक कार्यक्रमाला हजर होते. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री नांदेडला येणार पुढील महिन्यात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे नांदेड येथील पवित्र गुरुद्वाराचे दर्शन घेऊन जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सदरील कार्यक्रमाला जास्तीतजास्त संख्येने हजर राहण्याचे आवाहन यावेळी मंत्री ए. इंद्रकरण रेड्डी यांनी केले आहे.

टॅग्स :NandedनांदेडTelanganaतेलंगणा