शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात ज्येष्ठासह महिलांचा मतदानासाठी उत्साह; सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान

By श्रीनिवास भोसले | Updated: April 26, 2024 11:04 IST

पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांसह १०० वर्षीय आजीबाईंनीही केले मतदान

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात असलेल्या नांदेड लोकसभा मतदार संघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान झाले आहे. पहाटेपासूनच ज्येष्ठासह महिलांचा मतदानासाठी उत्साह दिसत आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ असून आज २ हजार ६८ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकूण १८ लाख ५१ हजार ८४३ मतदार आज आपला हक्क बजावणार आहेत.  सकाळच्या सत्रात मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान केंद्रावर उपस्थिती लावली आहे. वजीराबाद येथील महिला सखी केंद्रावर गुलाब पुष्प देऊन मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे.

नांदेड ग्रामीण भागातही मतदान उत्‍साहात सुरु झाले असून अनेक बुथवर मतदारांच्‍या रांगा दिसून आल्‍या आहेत. नांदेड शहरी व ग्रामीणमध्‍ये वयोवृध्‍द तसेच नवमतदारासह सर्व गटातील मतदारामध्‍ये मतदान करण्‍याचा उत्‍साह दिसून येत आहे. नांदेड लोकसभा मतदार संघातील नांदेड दक्षिण मध्‍ये सकाळी ९ वाजेपर्यत  सर्वाधिक १०.५ टक्‍के मतदान झाले असून सर्वात कमी मुखेड येथे ५.२ टक्‍के मतदान झाले आहे. भोकर ६.४५ टक्‍के, नांदेड उत्‍तर ७.९७ टक्‍के, नांदेड दक्षिण १०.०५ टक्‍के तर नायगाव ९.१७ टक्‍के आणि  देगलूर  ६.९ टक्‍के, मुखेड ५.२ टक्‍के मतदान झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह १०० वर्षीय आजीबाईंनीही केले मतदानजिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानाच्या नजीक असणाऱ्या कामगार कल्याण केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर हबीबाबी (वय १००) वर्ष यांनी नवीन हसापुर वाघीरोड नांदेड येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्र प्रथम असे स्लोगन देत नव मतदारांनी देखील मतदानासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या जनजागृतीनुसार सर्व नागरिकांनी मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :nanded-pcनांदेडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४