शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:29 IST

काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नांदेड रेल्वेस्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे़ त्याचबरोबर स्थानक व परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने वारंवार तपासणी केली जात असून विशेष रेल्वे सुरक्षा बलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे़

नांदेड : काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नांदेडरेल्वेस्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे़ त्याचबरोबर स्थानक व परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने वारंवार तपासणी केली जात असून विशेष रेल्वे सुरक्षा बलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे़दहशतवादी कारवायांशी संबंधीत अनेकांना नांदेडातून उचलण्यात आल्याच्या घटना काही वर्षापूर्वी घडलेल्या आहेत़ त्याचबरोबर नांदेड स्थानक उडवून देण्याच्या वारंवार येणाऱ्या धमक्या आणि मेलमुळे काही दिवसांपूर्वी नांदेड रेल्वेस्थानक परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ परंतु, तपासाअंती वेडसर व्यक्तीने सदर कृत्य केल्याचे पुढे आले होते़ दरम्यान, काश्मिरमध्ये गुरूवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे नांदेडसह अनेक रेल्वेस्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़नांदेड रेल्वेस्थानकातून देशातील विविध कानाकोप-यात रेल्वे जातात़ त्याचबरोबर नांदेड हे दहशतवादी कारवायासंबंधीत घडामोडीत चर्चेत असते़ त्यामुळे मागील काही दिवसांपासून स्थानकात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे़ त्यातच काश्मिरमध्ये घडलेल्या घटनेनंतर आणखी वाढ करण्यात आली आहे़ सध्या नांदेड स्थानकात रेल्वे पोलीस ठाण्याचे पाच अधिकारी आणि ४० कर्मचारी कर्तव्यावर आहेत़ त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि नव्याने विशेष रेल्वे सुरक्षा बलाची १०० जणांची तुकडी तैनात करण्यात आली आहे़नांदेड फलाटावर येणा-या तसेच संशयित हालचाली आढळून आल्यास पोलिसांकडून तत्काळ चौकशी केली जात आहे़ तर डॉग स्कॉडच्या सहाय्याने स्थानक आणि फलाटावर वारंवार तपासणी केली जात आहे़ अनोळखी वस्तू, रेल्वेतील बेवारस वस्तूंचीदेखील काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे़

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला