शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:13 IST

जिल्हा परिषदेतील वर्ग ३ कर्मचा-यांच्या बदल्यांना १ जूनपासून प्रारंभ होणार असून ४ जूनपर्यंत ११ विभागातील कर्मचा-यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे़

ठळक मुद्दे१ जूनपासून समुपदेशन वर्ग ३ संवर्गातील काम करणा-या कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

नांदेड : जिल्हा परिषदेतील वर्ग ३ कर्मचा-यांच्या बदल्यांना १ जूनपासून प्रारंभ होणार असून ४ जूनपर्यंत ११ विभागातील कर्मचा-यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे़जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांच्या जिल्हातंर्गत बदल्या १६ ते २५ मे या कालावधीत समुपदेशनाने प्रत्यक्ष बदलीची कार्यवाही पार पाडावयाची होती़ दरम्यानच्या काळात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकेची आचारसंहिता लागू होती़ या काळात बदल्यांची कार्यवाही करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग ठरत असल्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषदेतील कर्मचा-यांची बदली प्रक्रिया राबविता आली नाही़ त्यामुळे या बदल्यांना ७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़ यासंदर्भात शासनाने २७ मे रोजी परिपत्रक काढल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० मे रोजी वेळापत्रक घोषीत केले आहे़ १ जूनपासून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशनाने बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे़ सर्व समुपदेशनाच्या वेळी बदलीपात्र कर्मचा-याची वास्तव्य जेष्ठता यादी आणि विनंती अर्जाची यादी अद्यावत ठेवणे, रिक्त पदाचा आणि संभाव्य रिक्त पदाचा संवर्ग निहाय अहवाल अद्यावत ठेवणे, संवर्ग निहाय रिक्त पदाचा अहवाल व संभाव्य रिक्त पदाचा अहवाल स्क्रिनवर दाखविण्यासाठी प्रोजेक्टरची व्यवस्था करणे, व्हिडीओ रेकॉर्डची व्यवस्था करणे, प्रशासकीय बदलीमधून सुट असणा-या कर्मचा-यांचे आवश्यक असणारी कागद पत्राची सत्यप्रत सोबत ठेवणे आदी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या आहेत़१ जून रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत बांधकाम विभाग, ११ ते १२ या वेळेत लघुपाटबंधारे विभाग, दुपारी १२ ते १ या वेळेत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, १ ते ३ या वेळेत महिला व बालकल्याण विभाग, ३ ते ४ या वेळेत कृषी विभाग व सायंकाळी ४ ते बदलीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पशुसंवर्धन विभागाच्या बदल्या होणार आहेत़ २ जून रोजी सकाळी १० ते १ या वेळेत सामान्य प्रशासन विभाग, दुपारी १ ते ३ या वेळेत अर्थ विभाग व दुपारी ३ ते बदलीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकाच्या बदल्या होतील़ ३ जून रोजी सकाळी १० ते बदली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायत विभागातील व ४ जून रोजी सकाळी १० ते बदली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आरोग्य विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या होतील़शिपाई पदाच्या बदल्यांची मागणीजिल्हा परिषदेतील एकुण १३ हजार कर्मचा-यांपैकी ८ हजार ५०० शिक्षक संवर्गात येतात़ सुरूवातीस वर्ग ३ च्या कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत़ २ हजारांवर परिचारिक, ४५९ कनिष्ठ लिपीक, १४३ वरिष्ठ लिपीक, २४ कक्ष अधिकारी, १ हजार ८६ शिपाई, ७९ शिपाई आदी कर्मचा-यांच्या बदल्या होणार आहेत़शिपाई पदाच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने घेणे आवश्यक आहेत़ परंतु २ वर्षांपासून या बदल्या रखडल्या आहेत़ यावर्षी बदल्यांची मागणी होत आहे़ बदल्या न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा जि़ प़ कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी दिला आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदTeacherशिक्षकTransferबदली