शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र,व्हीव्हीपॅटची सरमिसळ प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:09 AM

नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि प्रथमच व्हीव्हीपॅट या यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्राची ईव्हीएम मॅनेजमेंट प्रणालीद्वारे प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रियेची माहिती राजकीय पक्षांच्या पक्ष प्रतिनिधींना देवून त्यांच्या समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

ठळक मुद्देनिवडणूक विभाग सज्ज : प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रियेची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली माहिती

नांदेड : नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि प्रथमच व्हीव्हीपॅट या यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्राची ईव्हीएम मॅनेजमेंट प्रणालीद्वारे प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रियेची माहिती राजकीय पक्षांच्या पक्ष प्रतिनिधींना देवून त्यांच्या समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे प्रफुल्ल कर्णेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजानन पांपटवार यांची उपस्थिती होती. जिल्ह्यामध्ये एकूण ९ विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये ८३ -किनवट , ८४- हदगाव , ८५-भोकर, ८६- नांदेड उत्तर, ८७- नांदेड दक्षिण , ८८- लोहा, ८९- नायगांव, ९०- देगलूर, ९१- मुखेड यांचा समावेश होतो. या मतदारसंघामध्ये एकूण २ हजार ९९१ मतदार केंद्रे असून यामध्ये किनवट - ३२४+५ (सहाय्यकारी मतदान केंद्रे), हदगाव-३१९+१ (सहाय्यकारी मतदान केंद्र), भोकर - ३२४+५ (सहाय्यकारी मतदान केंद्रे), नांदेड उत्तर- ३३६+१० (सहाय्यकारी मतदान केंद्रे), नांदेड दक्षिण-३०७+१७ (सहाय्यकारी मतदान केंद्रे), लोहा ३१२+३ (सहाय्यकारी मतदान केंद्रे), नायगाव-३४२ मतदान केंद्रे, देगलूर-३४६- मतदान केंद्रे, मुखेड-३४१ मतदान केंद्रे असे एकूण-२९९१ मतदान केंद्राचा समावेश आहे.

  • स्टॉंगरुममध्ये बॅलेट युनिट -६५५५, कंट्रोलींग युनिट-३६८९, व्हीव्हीपॅट-३९९१ उपलब्ध होते. त्यातून प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रियेने ८३ -किनवट मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयू) -४०५, कंट्रोलींग युनिट (सीयू) -४०५ आणि व्हीव्हीपॅट -४३८ व ८४- हदगांव मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बियू)-३९४, कंट्रोलींग युनिट (सीयू)-३९४, व्हीव्हीपॅट -४२६ तर ८५-भोकर मतदार संघाकरिता बॅलेट युनिट -४०५, कंट्रोलींग युनिट -४०५, व्हीव्हीपॅट -४३८, ८६- नांदेड उत्तरसाठी बॅलेट युनिट -४३०, कंट्रोलींग युनिट -४३०, व्हीव्हीपॅट -४६६ तर ८७-नांदेड दक्षिण बॅलेट युनिट -४०१, कंट्रोलींग युनिट -४०१, व्हीव्हीपॅट -४३५ तर ८८ -लोहा -बॅलेट युनिट -३८८, कंट्रोलींग युनिट -३८८, व्हीव्हीपॅट -४१९ तर ८९-नायगाव मतदार संघाकरिता बॅलेट युनिट -४२१, कंट्रोलींग युनिट -४२१, व्हीव्हीपॅट -४५५ तर ९०-देगलूर विधानसभा मतदारसंघाकरिता बॅलेट युनिट -426, कंट्रोलींग युनिट -४२६, व्हीव्हीपॅट-४६१ तर ९१-मुखेड विधानसभा मतदारसंघाकरिता बॅलेट युनिट -४२०, कंट्रोलींग युनिट -४२०, व्हीव्हीपॅट -४५४ यामध्ये ईव्हीएम मॅनेजमेंट प्रणालीद्वारे प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रिया केली आहे़
टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक