शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

धर्माबाद तालुक्यातील सहा गावांत निवडणूक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:23 IST

तालुक्यातील हासनाळी ग्रामपंचायतची सार्वत्रिक व पंधरा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक पार पडत असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सहा गावांतील एकही उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने त्या गावांतील निवडणूक रद्द झाली आहे. अकरा गावांत निवडणूक होत असून काही गावांतील सदस्यांची बिनविरोध निवड झाली तर पाच गावांत अटीतटीची लढत होत आहे.

ठळक मुद्देग्रा. पं. निवडणूक : शेवटच्या दिवसांपर्यंत एकही अर्ज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील हासनाळी ग्रामपंचायतची सार्वत्रिक व पंधरा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक पार पडत असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सहा गावांतील एकही उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने त्या गावांतील निवडणूक रद्द झाली आहे. अकरा गावांत निवडणूक होत असून काही गावांतील सदस्यांची बिनविरोध निवड झाली तर पाच गावांत अटीतटीची लढत होत आहे.धर्माबाद तालुक्यातील बाभळी (ध), बन्नाळी, राजापूर, आटाळा, पाटोदा (थ), आल्लूर-नेरली या सहा गावांत पोटनिवडणूक होत असून या गावांतून शेवटपर्यंत एकही अर्ज प्राप्त झाला नसल्यामुळे या गावात निवडणूक होणार नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. उर्वरित गावांत निवडणूक होत असून बेल्लूर (बु) गावातून मीनाताई राजेश्वर धानुरे, लक्ष्मीबाई पोशष्टी मदनुरे, शंकर गंगाराम कंठे यांची बिनविरोध निवड झाली. आतकूर- सुलोचना विठ्ठल हडपे, नायगाव (ध)- राजेश्वर गोविंदराव सदनपांडे, चोळाखा- सुमनबाई परसराम कदम, जारीकोट- पूजा विजय यडपलवार, माष्टी-शिवाजी नरसिंगा वडेटवार तर शेळगाव (थ) या गावातून विपीन ग्यानोबा सोनटक्के यांची बिनविरोध निवड झाली. तर पाच गावांत अटीतटीची निवडणूक होत आहे.आतकूर ग्रामपंचायतीत रमेश कागेरू व गंगाधर जाजुलवाड या दोघांत लढत होत आहे. जारीकोट ग्रामपंचायतीत रवींद्र मुपडे व बालाजी रामोड या दोघांत लढत होत आहे. चिकना ग्रामपंचायतींत मोहन पंढरी पांचाळ, महम्मद इब्राहिम बाशुमीयॉ, किरण हानमंत शेड्डे या तिघांत लढत होत आहे. चिंचोली ग्रामपंचायतींत गुरूराज कोदळे व मारोती काळे या दोघांत लढत होत आहे.हासनाळी ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडत असून सात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, मात्र सरपंचपदासाठी थेट जनतेतून निवडणूक पार पडणार असून अटीतटीची लढत होत आहे.सरपंचपदासाठी संतोष कावडे, संजय कावडे, हणमंत किरोळे या तिघांत लढत होत आहे. शिवशंकर पॅनलचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार - अजंनबाई गोविंदराव सकिरगे, गंगाधर नागोराव कावडे, सविता देवीदास वाघमारे, गंगाधर लक्ष्मण कावडे, लक्ष्मीबाई हणमंत आडकिणे. तर विरोधी गटाचे आकाश हणमंतराव किरोळे, योगिता हणमंतराव किरोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निरीक्षक डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार ज्योती चौव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार सुनील माचेवाड, निवडणूक निर्णय अधिकारी तथा न. प. कार्यालयीन अधीक्षक रूक्माजी भोगावार, निवडणूक निर्णय अधिकारी आर. एम. लोखंडे,एल. एन. गोडबोले, लिपीक एम.एम.टोंपे काम पाहत आहेत. धर्माबाद तालुक्यातील पाच गावांत २७ फेब्रुवारी रोजी मतदान तर २८ रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.