शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मुतखड्यावर प्रभावी व स्वस्त आयुर्वेदिक औषधाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:28 IST

पेटंट मिळाले; स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संशोधन; डिसोकॅॅल गोळ्या लवकरच उपलब्ध होणार

नांदेड : मुतखड्यावरील प्रभावी आणि स्वस्त औषध संशोधनात येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला यश आले आहे. ‘डिसोकॅल’ नावाने उत्पादित या आयुर्वेदिक औषधाला राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने विक्री परवाना दिला असून केंद्र सरकारचे पेटंटही मिळाले आहे.विद्यापीठातील जैवशास्त्र विभागाचे संशोधक डॉ. सी.एन. खोब्रागडे आणि डॉ. अमोल शिरफुले यांनी या संशोधनास १० वर्षापूर्वी सुरुवात केली होती. या आजारासाठी आयुर्वेदामध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट वनस्पतींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करुन हे औषध सिद्ध केले आहे. सध्या ते गोळ्यांच्या स्वरुपात उपलब्ध होईल. या गोळ्यांमुळे मुतखडा पूर्ण बरा होतो शिवाय तो परत होत नाही, अशी माहिती कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी दिली.हैदराबादमधील राष्ट्रीय पोषण संस्थेत या औषधाच्या उंदरावर चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यातही औषधी घटक मुतखड्याचे विघटन व नंतर त्याचे उत्सर्जन वाढवते आणि मुतखड्याच्या पुनर्निर्माण प्रक्रियेस प्रतिबंध करीत असल्याचे आढळले. या यशस्वी प्रयोगानंतर नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात प्रा. डॉ. आर.एच. अमीलकंठवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल रुग्णांवर प्रयोग करण्यात आले. त्यानंतर ‘डिसोकॅल’ या नावाने औषध तयार करण्यात आले, असेही डॉ. विद्यासागर यांनी सांगितले.इतर औषधांच्या तुलनेत स्वस्त देशभरात मुतखडा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ९ टक्के असणारे रुग्णांचे प्रमाण सध्या १५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. आम्ही विकसित केलेल्या आयुर्वेदिक गोळ्या घेतल्यानंतर पुन्हा मुतखडा होत नाही. शिवाय उपलब्ध औषधांपेक्षा याची किंमत कितीतरी स्वस्त असेल.- डॉ. सी.एन. खोब्रागडे, मुख्य संशोधकराज्यात अनेक ठिकाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. हजारो खेडेगावांतील लोकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी बोअरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. बोअरच्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने मुतखडा होतो. सध्यस्थितीत राज्यात हजारो गावामंध्ये शेकडो मुतखड्याचे रुग्ण दिसतात. त्यांना या औषधामुळे दिलासा मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, असलेला मुतखडा पडल्यानंतर तो परत उद्भवतो. या औषधामुळे त्याला प्रतिबंध होणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधं