यशवंत वार्षिक ऑनलाइन युवक महोत्सव: २०२१ उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. या प्रसंगी उद्घाटक डॉ. विवेक सावंत, प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे, समन्वयक प्रा.डॉ. महेश कळंबकर, उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. विवेक सावंत यांनी, तरुणांना यशस्वी होण्याकरिता ८५ टक्के सॉफ्ट स्किल्स व १५ टक्के हार्ड स्किलची गरज असल्याचे सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करिअरच्या संधी प्राप्त होऊ शकतील. सामाजिकदृष्ट्या उपयुक्त कार्य म्हणजेच ज्ञान असून समाजातील शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या जीवनातील प्रश्न सोडवणारी संस्था म्हणजे उच्चशिक्षण होय असे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि मानसिक ऊर्जेचा योग्य उपयोग शैक्षणिक उपक्रमांमध्ये करावयास हवा, तरच त्यांचा सर्वांगीण विकास होईल. प्रत्येक शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना योग्य वाव मिळवून देण्याकरिता प्लॅटफॉर्म निर्माण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. युवक महोत्सवाचे समन्वयक प्रा.डॉ. महेश कळंबकर यांनी २२ ते २७ फेब्रुवारीदरम्यान सिस्को वेबेक्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा.डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले, प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.डॉ. अजय गव्हाणे यांनी करून दिला तर आभार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा.डॉ. एल.व्ही पद्मा राव यांनी मानले.
शैक्षणिक मूल्यांची दैनंदिन जीवनात अंमलबजावणी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST