शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कामे अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:32 IST

विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या स्थलांतरणाला तीन वर्षे लोटली आहेत़ परंतु, अद्यापही या ठिकाणची प्राथमिक व अत्यावश्यक असलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केली नाहीत़ ही कामे न करताच रुग्णालयाचा गाडा हाकावा लागत असल्यामुळे प्रशासनाची मात्र मोठी पंचाईत होत आहे़ याबाबत रुग्णालय प्रशासनाने बांधकाम विभागाला पत्र पाठविले आहे़

ठळक मुद्दे७० लाखांचा निधी मंजूर होऊन तीन वर्षे उलटली

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या स्थलांतरणाला तीन वर्षे लोटली आहेत़ परंतु, अद्यापही या ठिकाणची प्राथमिक व अत्यावश्यक असलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केली नाहीत़ ही कामे न करताच रुग्णालयाचा गाडा हाकावा लागत असल्यामुळे प्रशासनाची मात्र मोठी पंचाईत होत आहे़ याबाबत रुग्णालय प्रशासनाने बांधकाम विभागाला पत्र पाठविले आहे़सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या गाजत असलेल्या विविध घोटाळ्यांमुळे चर्चेत आला आहे़ नको त्या ठिकाणी रस्ते करुन निधीचा अपव्यय करण्यात या विभागाचा हातखंडा आहे़ परंतु, स्थलांतरण होवून तीन वर्षे लोटली तरी या ठिकाणच्या अनेक कामांना अद्याप मुहूर्तच लागला नाही़ २० आॅक्टोबर २०१५ रोजी विष्णूपुरी येथे रुग्णालय सुरु करण्यात आले होते़ तेव्हापासून येथील प्राथमिक व अत्यावश्यक कामांची अवस्था ‘जैसे थे’ च आहे़रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाची दुरुस्ती, आंतररुग्ण विभागात पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, स्वच्छता, रंगरंगोटी, आंतररुग्ण विभागाच्या इमारतीतील खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसविणे, जीवरसायनशास्त्र विभागाची दुरुस्ती, झेंडावंदन परिसराची दुरुस्ती, रुग्णालय बाह्यरुग्ण विभागात स्वच्छता, पीएसएम व उपहार गृहाची दुरुस्ती, पार्कींग शेड, ट्रॅफीक बॅरिकेटची दुरुस्ती, शस्त्रक्रिया विभागातील फ्लोरींगची दुरुस्ती यासह अनेक कामे प्रलंबित आहेत़ त्यासाठी जवळपास ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहे़परंतु अद्यापही या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने हात लावला नाही़ याबाबत प्रशासनाकडून अनेकवेळा पाठपुरावा करण्यात येतो़ परंतु बांधकाम विभागाकडून प्रशासनाच्या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात येते़गतिरोधक नसल्यामुळे अपघात- रुग्णालयात दररोज शेकडो वाहने येतात़ अधिष्ठातांचे कार्यालय, विद्यार्थी वसतिगृह हे सर्व एकाच रस्त्यावर आहे़ याच रस्त्यावरुन विद्यापीठातील विद्यार्थीही येतात़ परंतु या रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अनेकवेळा अपघात होत आहेत़दोनच दिवसापूर्वी विद्यार्थ्यांच्या वाहनांचा अपघात झाला़ होता. त्यामुळे या रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसवावे, अशी मागणी प्रशासनाकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded civil hospitalजिल्हा रुग्णालय नांदेडhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य